TRENDING:

विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस, कोल्हापुरात अवकाळी संकट, शेतकऱ्यांचे नुकसान

Last Updated:
Kolhapur Rain: गेल्या काही काळात उन्हाने हैराण कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला. मंगळवारी रात्री शहरासह काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला.
advertisement
1/5
विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस, कोल्हापुरात अवकाळी संकट, शेतकऱ्यांचे नुकसान
गेल्या काही काळापासून कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. अशातच मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरणात मोठे बदल झाले आणि रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उष्णतेपासून काहीसा आराम मिळाला.
advertisement
2/5
गेल्या काही काळात कोल्हापुरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. मार्चमध्ये सरासरीपेक्षा तापमान जास्त असल्याने कोल्हापूरकर उन्हाच्या चटक्यांनी हैराण झाले आहेत. अशातच मार्चअखेर वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. हवामान विभागानं देखील मंगळवारी कोल्हापूरसाठी यलो अलर्ट दिला होता.
advertisement
3/5
25 रोजी दुपारनंतरच कोल्हापूरसह जिल्ह्यातील काही भागात हवापालट जाणवू लागली. विजांच्या कडकडाटात अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. सोयाबीन, मका आणि कडधान्यांच्या पिकांवर पावसाचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
advertisement
4/5
पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पीकं भिजली असून, त्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे काही शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होईल. प्रशासनाच्या वतीने पीकविम्याचे नियम आणि शेतकऱ्यांना तातडीने मदतीची योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच, शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन दिलं जात आहे.
advertisement
5/5
कोल्हापुरात पुढील काही दिवस अवकाळी संकट कायम असणार आहे. हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस, कोल्हापुरात अवकाळी संकट, शेतकऱ्यांचे नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल