TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात रविवारचा दिवस जोरदार पावसाचा, 22 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि कोकणात देखील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रात रविवारचा दिवस जोरदार पावसाचा, 22 जिल्ह्यांना अलर्ट
पोषक हवामान तयार झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि कोकणात देखील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/7
विदर्भात देखील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाहुयात 26 ऑक्टोबर रोजी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर संध्याकाळी 40 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव सह नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला 26 तारखेसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. हिंगोली आणि नांदेड वगळता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भात अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, नैऋत्य मान्सून माघारी परतल्यानंतरही राज्यात पोषक वातावरण तयार झाले असल्याने पाऊस होत आहे. हा पाऊस रब्बी हंगामातील पेरणीसाठी उपयुक्त असला तरी यामुळे कापूस आणि अन्य काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Weather Alert : महाराष्ट्रात रविवारचा दिवस जोरदार पावसाचा, 22 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल