Guess Who : कधी सिमेंटचं दुकान कधी फोनबुथमध्ये काम, 250 रुपये पहिला पगार, फोटोतील चिमुकला आज कोट्यवधींचा मालक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकल्या मुलाला ओळखलं? कधी सिमेंटच्या दुकानात तर कधी टेलिफोनबुथमध्ये काम करायचा. आज कोटी रुपयांचा मालक आहे.
advertisement
1/8

बॉलीवूडपासून साऊथ इंडस्ट्रीपर्यंत सुपरस्टार होण्याचा प्रवास सोपा नसतो. अनेक कलाकारांनी यश मिळवण्याआधी प्रचंड संघर्ष केला आहे. रजनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही करिअरच्या सुरुवातीला छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या आणि त्यानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत मोठं स्थान मिळवलं.
advertisement
2/8
फोटोत दिसणारा हा लहान मुलगा आज प्रसिद्ध अभिनेता आहे. कधी 250 रुपयांच्या पगारासाठी नोकरी करणारा हा अभिनेता आज 170 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. कोण आहे हा अभिनेता
advertisement
3/8
या अभिनेत्यानं हिरो असो वा व्हिलन प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केलं आहे. रजनीकांत, थलपती विजयपासून ते बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्याने काम केलं आहे. त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
advertisement
4/8
अभिनेत्याचं सहावीपर्यंतचं शिक्षण तिथे झाल्यानंतर तो चेन्नईला आला. अभ्यासात तो फारसा हुशार नव्हता. त्याच्या कमी उंचीमुळे शाळेत त्याची खिल्ली उडवली जायची. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने सिनेमासाठी ऑडिशन दिलं. पण उंची कमी असल्याने तो सिलेक्ट झाला नाही.
advertisement
5/8
त्यानंतर पोटापाण्यासाठी त्याने अनेक छोट्या नोकऱ्या केल्या. कधी रिटेल स्टोअरमध्ये सेल्समन, कधी फास्ट फूड जॉइंटमध्ये कॅशियर, तर कधी फोन बूथ ऑपरेटर म्हणूनही त्याने काम केलं. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तो घाऊक सिमेंट व्यवसायात अकाउंट असिस्टंट म्हणून काम करू लागला.
advertisement
6/8
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजेच विजय सेतुपती आहे. यानंतर जास्त पगाराच्या आशेने तो दुबईला गेला आणि तिथे अकाउंटंट म्हणून नोकरी करू लागला. दुबईत काम करताना त्याची ओळख भविष्यातील पत्नी जेसीशी झाली. त्यांनी 2003 मध्ये दोघांनी लग्न केलं. मात्र नोकरीत समाधान न मिळाल्याने विजय भारतात परतला आणि एका मार्केटिंग कंपनीत काम करू लागला. पुढे तो चेन्नईतील 'कुथु-पी-पट्टराई' या थिएटर ग्रुपमध्ये अकाउंटंट आणि अभिनेता म्हणून सामील झाला.
advertisement
7/8
यानंतर विजयने काही चित्रपटांत बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून काम केलं. 2006 साली आलेल्या 'दिश्युम' या सिनेमात त्याने काम केलं त्यासाठी त्याला 250 रुपये मिळाले होते. 2010 साली 'थेनमेरकु पारुवाकात्रु' या सिनेमातून त्याला ब्रेक मिळाला. या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
advertisement
8/8
‘सुपर डिलक्स’मधील भूमिकेसाठी विजय सेतुपतीला 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं. शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमासाठी त्याला 21 कोटी फी दिल्याचं बोललं जातं. विजयची एकूण संपत्ती सुमारे 170 कोटी रुपये आहे. चेन्नईतील 50 कोटींचा आलिशान बंगला, 100 कोटींची रिअल इस्टेट गुंतवणूक आणि लक्झरी कार कलेक्शन आहेय
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : कधी सिमेंटचं दुकान कधी फोनबुथमध्ये काम, 250 रुपये पहिला पगार, फोटोतील चिमुकला आज कोट्यवधींचा मालक