मतमोजणीच्या काळात दंगा काबू पथक, एसआरपीएफचे 400 पेक्षा अधिक शस्त्रधारी जवान गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होईल. मतदानासह मतमोजणी प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गरवारे हायटेक फिल्म, उस्मानपुऱ्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये मतमोजणी पार पडेल.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, पुढील 24 तास महत्त्वाचे!, हवामान खात्याकडून अलर्ट
सर्व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाइल, टॅबलेटचा वापर, देवाणघेवाण करता येणार नाही. निवडणुकीसंबंधी अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व निवडणूक नियुक्त कर्मचारी, वाहनांनाच प्रवेश असेल, असे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी काढले.
मतमोजणी पूर्ण होईपर्यंत हे सर्व मार्ग बंद राहतील. यादरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले आहे.
हे मार्ग राहतील बंद
विट्स हॉटेल चौक ते गाडे चौक
एसएससी बोर्ड टी पॉइंट ते पीरबाजार चौकपर्यंत
सेव्हन हिल उड्डाणपूल पूर्व बाजू ते आकाशवाणी चौक रस्त्याची दक्षिण बाजू
(जालना- अहिल्यानगर मार्ग दिशा)
यादरम्यान आकाशवाणी चौक ते सेव्हन हिल उड्डाणपुलाची पूर्व बाजूची वाहतूक सुरू असेल.






