Kolhapur Rain : कोल्हापुरात तुफान पाऊस, ठिकठिकाणी साचलं पाणी, 7 भयानक PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
advertisement
1/7

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
advertisement
2/7
ओढे-नाल्यांना पूर आल्याने नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे.
advertisement
3/7
शहरातील प्रमुख चौकांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यातून रस्ता काढत चालावे लागत आहे.
advertisement
4/7
सोमवार पासून असणाऱ्या ढगाळ वातावरणानंतर सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर जोर धरला. सलग तीन तास मुसळधार पाऊस कोसळल्याने राजारामपुरी, शाहूपुरी, कावळा नाका, जयंती नाला यासारख्या प्रमुख भागात पाणी तुंबले.
advertisement
5/7
रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यास विलंब झाल्याने वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागले. विशेषतः राजारामपुरीतील ओढ्याला पूर आल्याने परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
advertisement
6/7
यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था अपुरी पडल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत आहेत.
advertisement
7/7
त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Rain : कोल्हापुरात तुफान पाऊस, ठिकठिकाणी साचलं पाणी, 7 भयानक PHOTOS