Latur News : पोळ्यानिमित बैल धुण्यासाठी तळ्यात उतरला अन्..; 24 तासांनंतर धक्कादायक अवस्थेत मिळाला मृतदेह
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur News : बैलपोळ्याच्या दिवशी तळ्यात बैल धुताना बुडालेल्या तरुणाचा 2 दिवसानंतर मृतदेह मिळाला. (नितिन बनसोडे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील चोंडी येथे पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी तळ्यात गेलेल्या 16 वर्षीय तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली दोन दिवसापूर्वी समोर आली होती.
advertisement
2/5
मयत विकास रमेश कांबळे हा युवक बैल धुण्यासाठी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तलावात गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.
advertisement
3/5
या घटनेची माहिती समजल्यानंतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून सूचना केल्या. त्यानंतर मृतदेह शोधकार्य मोहिम सुरु झाली. मात्र मृतदेह मिळाला नाही.
advertisement
4/5
रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मृतदेह शोधकार्यास सुरुवात झाली. आज युवकाचा मृतदेह हाती आला.
advertisement
5/5
याबाबत मयताचे नातेवाईक नामदेव कांबळे यांच्या माहितीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : पोळ्यानिमित बैल धुण्यासाठी तळ्यात उतरला अन्..; 24 तासांनंतर धक्कादायक अवस्थेत मिळाला मृतदेह