Maharashtra Weather Forecast : राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट, हवामान विभागाचा रेड अलर्ट
- Published by:Suraj Yadav
 
Last Updated:
IMD Weather Forecast : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.
advertisement
1/5

राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, जळगाव या जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/5
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा इथं पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
advertisement
5/5
सोमवारी 26 ऑगस्टलासुद्धा राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. नंदूरबार, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maharashtra Weather Forecast : राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट, हवामान विभागाचा रेड अलर्ट