Mahesh Manjrekar : '100 कोटी देणारा निर्माता टॉर्च घेऊन शोधतोय', असं का म्हणाले महेश मांजरेकर!
- Published by:Minal Gurav
 
Last Updated:
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांनी शिवाजीराजे भोसले सिनेमासाठी 100 कोटींच्या प्रोड्यूसरचा शोध घेत असल्याचे सांगितले, पॅन इंडिया सिनेमावर भर देण्याचा विचार व्यक्त केला.
advertisement
1/6

 अभिनेते महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने महेश मांजरेकर यांनी अनेक मुलाखती दिल्या.
advertisement
2/6
 दरम्यान अभिनेते महेश मांजरेकर 100 कोटी देणाऱ्या प्रोड्यूसरचा टॉर्च घेऊन शोध घेत आहेत असं त्यांनी सांगितलं.
advertisement
3/6
 तारांगणला दिलेल्या मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, "ज्या दिवशी मराठी सिनेमा कात टाकेल आणि बजेटनुसार जरासा मोठा, चांगले विषय तर आपल्याकडे खूप आहेत. चांगला विषय घेऊन जेव्हा मोठ्या बजेटचा सिनेमा करेल".
advertisement
4/6
 "तुम्हाला जर 450 कोटी 600 कोटींमध्ये पोहोचायचं असेल तर तुम्हाला तो ऑल ओवर इंडिया आणि ऑल ओव्हर वर्ल्ड रिलीज करावा लागेल त्यामुळे कांतारा जर कन्नडमध्ये असता तर त्याने इतका बिझनेस केला नसता. कांतारा किंवा केजीएफ, केजीएफ 2 हे सिनेमे पॅन इंडिया होते म्हणून ते एवढं करू शकले तसा आपण एक सिनेमा काढायला हवा जो पॅन इंडिया आहे, सगळ्या भाषेत."
advertisement
5/6
 महेश मांजरेकर पुढे म्हणाले, "उद्या जर मला या सिनेमाला घवघवीत यश मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदीत डब करा. शेतकऱ्यांचा विषय हा देशभरातील विषय आहे. माझा पंजाब, मध्यप्रदेश,केरळमधील शेतकरीही तेवढाच त्रासलेला आहे."
advertisement
6/6
 "मी म्हटलं मी एक पिक्चर असा करेन जो 450 कोटी करेल आणि वाजेल. मी एक टॉर्च घेऊन एका प्रोड्युसरला शोधतोय. तो किमान 100 कोटीचा तरी पिक्चर पाहिजे. बाकी सगळ्यांची सोंग आणाल पण पैशांचं सोंग कसं आणाल. हे घे कर पिक्चर, एवढा विश्वास पाहिजे माझ्यावर, मग मी दाखवून देईन की आपण काय करू शकतो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mahesh Manjrekar : '100 कोटी देणारा निर्माता टॉर्च घेऊन शोधतोय', असं का म्हणाले महेश मांजरेकर!