मराठा आंदोलक विनोद पाटील थोडक्यात बचावले, कार्यक्रमाला पोहचल्यावर अचानक मोठा स्फोट,एकच गोंधळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
कार्यक्रमादरम्यान गॅसचे फुगे फुटले आणि मोठा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
1/7

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावर काल रात्री जीवघेणा प्रसंग ओढावला. शहरातील एका नवीन आईस्क्रीम दुकानाच्या उद्घाटनासाठी ते मुख्य अतिथी म्हणून गेले असताना मोठी दुर्घटना केली आहे.
advertisement
2/7
अचानक गॅसच्या फुग्यांचा मोठा स्फोट होऊन परिसरात आग लागली. सुदैवाने पाटील यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
advertisement
3/7
समोर आलेल्या माहितीनुसार, दुकानाच्या उद्घाटनासाठी आयोजकांनी रंगीबेरंगी फुग्यांची सजावट केली होती. हे फुगे गॅसने भरलेले होते.
advertisement
4/7
कार्यक्रमादरम्यान गॅसचे फुगे फुटेल आणि मोठा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
5/7
स्फोटाची तीव्रता इतकी होती की फुग्यांचा आवाज काही अंतरावरपर्यंत ऐकू गेला. आगीमुळे सजावटींचे साहित्य, बॅनर्स आणि स्टॉलचे नुकसाना झाले.
advertisement
6/7
स्फोटामुळे उद्घाटनाचा आनंद क्षणात गोंधळात बदलला असला तरी मोठा जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
advertisement
7/7
या प्रकारामुळे कार्यक्रम आयोजित करताना गॅस फुग्यांच्या वापराबाबत अधिक सतर्कता आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मराठा आंदोलक विनोद पाटील थोडक्यात बचावले, कार्यक्रमाला पोहचल्यावर अचानक मोठा स्फोट,एकच गोंधळ