TRENDING:

ट्रकवरचं नियंत्रण सुटलं, सिमेंट पोलला गाडी धडकली, चालक जागेवर गेला, बॉडीचे तुकडे गोळा करण्याची वेळ

Last Updated:
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भरधाव ट्रकचा अपघात होऊन चालकाचा जागेवर मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
1/5
ट्रकवरचं नियंत्रण सुटलं, सिमेंट पोलला गाडी धडकली, चालक जागेवर गेला
अनिस शेख, प्रतिनिधी, पुणे लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील भीषण अपघात ट्रक चालकाचा भीषण अपघात झाला आहे. लोणावळ्याजवळील अमृतांजन ब्रिज येथील पुलाला ट्रकची जोरदार धडक बसल्याने अपघात झाल्याचे समजते.
advertisement
2/5
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने उतारावरील ट्रक अमृतांजन ब्रिजच्या सिमेंट पोलला धडकल्याने अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
3/5
महामार्ग पोलीस तसेच देवदूत यंत्रणा यांनी घटनास्थळावर पोहोचून ट्रकमध्ये अडकून छिन्न विछिन्न झालेल्या ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढून त्यास शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
advertisement
4/5
या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी एक लेन बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे महामार्गावर मुंबई लेनला वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
5/5
अवजड क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक महामार्ग बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे. घटनेचा अधिक तपास लोणावळा महामार्ग पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ट्रकवरचं नियंत्रण सुटलं, सिमेंट पोलला गाडी धडकली, चालक जागेवर गेला, बॉडीचे तुकडे गोळा करण्याची वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल