TRENDING:

गौरी गणपतींमुळे फुलांचा दरवळ महाग, विदर्भाच्या सर्वात मोठ्या बाजारात पाहा काय आहेत रेट

Last Updated:
गणेशोत्सवात फुलांना मोठं महत्त्व आहे. पूजेसाठी फुलांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे विदर्भाच्या सर्वात मोठ्या बाजारात फुलांचे भाव वाढले आहेत.
advertisement
1/7
गणपतींमुळे फुलांचा दरवळ महाग, बाजारात पाहा काय आहेत रेट
महाराष्ट्रसह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात फुलांना मोठं महत्त्व आहे. पूजेसाठी फुलांचा वापर करण्यात येतो.
advertisement
2/7
त्यामुळे गणेशोत्सव आणि गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भाच्या सर्वात मोठ्या <a href="https://news18marathi.com/maharashtra/nagpur/">नागपुरातील</a> नेताजी फुल मार्केटमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असली तरी फुलांची मागणी लक्ष्यात घेता बाजारात फुलांचे भाव वाढले आहेत.
advertisement
3/7
आज बाजारात शेवंती 200-250 रुपये प्रति किलो आहे तर काही दिवसापूर्वी हा दर 120-140 प्रती किलो होता, गुलाब ( तुकडा ) हा आज 300 रुपये प्रति किलो आहे तर तो काही दिवसापूर्वी 240 रुपयांपर्यंत होता.
advertisement
4/7
निशिगंध 250-300 रुपये प्रति किलो, जरबेरा 40- 60 रुपये बंडल, देशी गुलाब 150 ते 200 रुपये किलो असे आजचे दर असून गौरी पूजनाच्या आधी हेच दर 50-60 रुपयांनी कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
advertisement
5/7
बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने शेत मालाला मोठा फटका बसल्याने हे दर वाढले असल्याचे देखील विक्रेत्यांनी सांगितले.
advertisement
6/7
दररोज या बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक आणि जावक होत असते. दिवसाकाठी या ठिकाणी जवळ जवळ 30-40 लाख रुपयांची उलाढाल होत असते.
advertisement
7/7
तर दिवाळी, दसरा, आणि आत्ता सुरू असलेल्या या गणेशोत्सवात सणांच्या दिवसात हीच आकडेवारी 1 ते 1.50 करोड रुपयांपर्यंत जाते, अशी माहिती नेताजी फुल मार्केट ठोक आणि चिल्लर फुल विक्री संघाचे अध्यक्ष विजय वंजारी यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
गौरी गणपतींमुळे फुलांचा दरवळ महाग, विदर्भाच्या सर्वात मोठ्या बाजारात पाहा काय आहेत रेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल