Nagpur Blast : नागपूरमध्ये भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू, कंपनीबाहेरचे फोटो आले समोर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडल्याची माहिती समजते. स्फोटानंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य केलं जात आहे.
advertisement
1/5

नागपूरमध्ये एका कंपनीत भीषण स्फोट झाला असून यात ९ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बाजार गाव इथं असलेल्या सोलर एक्स्प्लोजिव कंपनीत ही दुर्घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
2/5
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाजारगाव इथं सोलर एक्सप्लोसिव कंपनी आहे. या कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समजते.
advertisement
3/5
पॅकिंगवेळी ही दुर्घटना घडली आहे. स्फोट झाल्याची माहिती समजताच कंपनीच्या गेटसमोर मोठी गर्दी झाली आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची किंवा जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.
advertisement
4/5
रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडल्याची माहिती समजते. स्फोटानंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य केलं जात आहे.
advertisement
5/5
सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळा पुरवण्याचं काम करते. संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही कंपन्यांना दारुगोळ्याची गरज असते.एक्सप्लोजिव्हमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल वापरले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Blast : नागपूरमध्ये भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू, कंपनीबाहेरचे फोटो आले समोर