TRENDING:

विदर्भात थंडीचा जोर, गोंदियातील पारा घसरला, आजच्या हवामानाचा अंदाज काय?

Last Updated:
 विदर्भातील तुरळक जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. 1 जानेवारीला विदर्भातील वातावरण कोरडे असून मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. 
advertisement
1/5
विदर्भात थंडीचा जोर, गोंदियातील पारा घसरला, आजच्या हवामानाचा अंदाज काय?
गेल्या वर्षात राज्यातील वातावरणात सातत्याने विचित्र बदल घडून आलेले आपण बघितले. नवीन वर्षाच्या सुरवातीला राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली होती. त्यानुसार आता राज्यात विविध ठिकाणी थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. विदर्भातही किमान तापमानात घट होताना दिसून येत आहे.
advertisement
2/5
विदर्भातील तुरळक जिल्ह्यांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 1 जानेवारीला किमान तापमानात घट झाली आहे. 17 ते 18 अंशावरून नागपूर मधील किमान तापमान 13 अंशावर आलेलं बघायला मिळत आहे. विदर्भात गेले कित्येक दिवस ढगाळ आकाश आणि धुके कायम होते. आज 1 जानेवारीला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.
advertisement
3/5
अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील किमान तापमानात देखील 3 ते 4 अंशांनी घट झालेली बघायला मिळत आहे. नागपूर प्रमाणे या जिल्ह्यातही मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. वर्धा जिल्ह्यातील किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी सुद्धा 1 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.
advertisement
4/5
गोंदियामधील किमान तापमानात सर्वाधिक घट होऊन तेथील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. वाशिम आणि गडचिरोली मधील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस तर भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील किमान तापमानात घट झालेली बघायला मिळत आहे. त्यामुळे आता विदर्भात आता थंडीचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
5/5
विदर्भावर गेल्या वर्षात अनेक आस्मानी संकट आलेत. अवकाळी पाऊस, थंडी, ढगाळ वातावरण या सर्वांमुळे शेतकऱ्यांचे अधिकाधिक नुकसान झालेत. मात्र नवीन वर्षाची सर्वात निरभ्र आकाश असल्याने झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात थंडीचा जोर, गोंदियातील पारा घसरला, आजच्या हवामानाचा अंदाज काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल