विदर्भात पाऊस थांबला, आता थंडीचा जोर वाढणार, पाहा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भात पावसाने खूप दिवस धुमाकूळ घातला. आता कोरडे वातावरण बघायला मिळत आहे. अशातच आता थंडीचा जोर सुद्धा वाढणार आहे.
advertisement
1/5

राज्यात गेले काही दिवस हवामान कोरडे आणि स्वच्छ असल्याचे बघायला मिळत आहे. त्याचबरोबर थंडीचा जोर वाढत आहे. विदर्भातही सध्या कोरडे हवामान बघायला मिळत असून पहाटेच्या वेळी थंडीचा जोर अधिक वाढत आहे. विदर्भात या वर्षी सुरवातीपासूनच पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेत.
advertisement
2/5
गेले काही दिवस कोरडे वातावरण असल्याने सोयाबीन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज भाऊबीजेच्या दिवशी विदर्भात हवामान कोरडे राहून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. नागपूरमध्ये आज धुक्यासह ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांत आज वातावरण कोरडे राहून स्वच्छ सूर्यप्रकाश असणार, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. नागपूरमध्ये आज कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
4/5
आता विदर्भातील किमान तापमानात घट होऊन गुलाबी थंडीचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे. सद्यस्थितीमध्ये पहाटेच्या वेळी थंडीचा जोर जास्त असल्याचे दिसून येत आहे. आता पर्यंत पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेत आता थंडी जीव घेणार का? असा विचार शेतकऱ्यांच्या मनात सुरू आहे.
advertisement
5/5
तूर पिकाला बहार आला आहे थंडीचा जोर वाढल्याने तूर पिकावर दव जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ढगाळ वातावरण असल्यास अळीसुद्धा पडण्यास सुरवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात पाऊस थांबला, आता थंडीचा जोर वाढणार, पाहा हवामान अंदाज