Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने घेतला कुटुंबाचा बळी; पती-पत्नीसह 5 वर्षीय बालक जागीच ठार! घटनेचे PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nanded Accident : नांदेड-बीदर महामर्गावर झालेल्या अपघातात पती-पत्नी आणि पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/5

मुक्रमाबाद-नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावर बिहारीपूरजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर मोटारसायकल आदळून झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी व पाच वर्षीय चिमुकला ठार झाला. ही दुर्दैवी घटना 23 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.
advertisement
2/5
परतपूर फाटा येथील मोहसीन गणीसाब शेख (वय 30), पत्नी फरिदा मोसीन शेख (वय 28), जुनेद मोसिन शेख (वय 5) हे तिघेजण मुखेडकडून मुक्रमाबादकडे येत होते.
advertisement
3/5
यावेळी बिहारीपूर येथील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रॉलीवर मोटारसायकल आदळून तिघेही ठार झाले. तिघांना मुक्रमाबाद येथे रुग्णालयात घेऊन जात असताना मोहसीन गणीसाब शेख व फरीदा मोहसीन शेख या जोडप्याचा मृत्यू झाला.
advertisement
4/5
तर, उपचारासाठी उदगीर येथे घेऊन जाताना जखमी बालक जुनेद शेख याचा वाटेतच मृत्यू झाला.
advertisement
5/5
आरोग्य केंद्र मुक्रमाबाद येथे तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने घेतला कुटुंबाचा बळी; पती-पत्नीसह 5 वर्षीय बालक जागीच ठार! घटनेचे PHOTOS