Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी फोडली काँग्रेस आमदाराची गाडी, PHOTOS आले समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मुजीब शेख, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे, नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली आहे.
advertisement
1/7

मोठी बातमी समोर येत आहे, नांदेड दक्षिण काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे.
advertisement
2/7
नांदेड शहराजवळच्या पुंड पिंपळगाव येथे रात्री ही घटना घडली . या गावात किर्तनाचा कार्यक्रम होता. किर्तन ऐकण्यासाठी आमदार हंबर्डे गावात गेले होते.
advertisement
3/7
ते कार्यक्रमात असताना, बाहेर उभी असलेली त्यांची गाडी काही मराठा आंदोलकांनी फोडली. या घटनेत आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित आहेत.
advertisement
4/7
दरम्यान मोहन हंबर्डे यांची गाडी काल रात्री फोडण्यात आली होती, या घटनेनंतर सतर्कता म्हणून आमदार हंबर्डे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
advertisement
5/7
शहरातील विष्णुपुरी भागातील इंदीरा निवास येथे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ते किर्तनाच्या कार्यक्रमाला गेले असताना हा प्रकार घडला आहे.
advertisement
6/7
मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, या घटनेत ते सुरक्षित आहेत, मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
advertisement
7/7
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, मराठा आंदोलक आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे, मराठा आरक्षणासाठी येत्या वीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी फोडली काँग्रेस आमदाराची गाडी, PHOTOS आले समोर