Nanded News : नांदेडमध्ये रेतीच्या टिप्परने दुचाकीस्वारांना चिरडलं! 2 युवक जागीच ठार, घटनास्थळाचे भयावह PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nanded News : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी रेतीच्या टिप्परने दिलेल्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झाला. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/5

महाराष्ट्रात अपघाताचे सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. नांदेड जिल्ह्यात आज रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
advertisement
2/5
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
advertisement
3/5
सगरोळी येथील नवीन पवार आणि मोईन शेख हे युवक आपल्या दुचाकीवरुन सगरोळीकडून गावातील बस्थानकाकडे जात होते. रेती घाटातून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने या मोटारसायकला जोराची धडक दिली.
advertisement
4/5
या अपघातात नवीन पवार आणि मोईन शेख हे युवक जागीच ठार झाले. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
5/5
दरम्यान, या घटनेनंतर रस्ते अपघाताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded News : नांदेडमध्ये रेतीच्या टिप्परने दुचाकीस्वारांना चिरडलं! 2 युवक जागीच ठार, घटनास्थळाचे भयावह PHOTOS