Food business: कोकणी खाजा अन् लाडूंची कमाल, सिंधुदुर्गचा तरुण करतोय 80 लाखांची उलाढाल
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Food business: कोकणातील जत्रा-यात्रा या खाजा आणि लाडूंशिवाय पूर्ण होतच नाहीत. कोकणातील जत्रेमध्ये प्रामुख्याने खाजा, लाडू आणि इतर पदार्थांची दुकाने असतातच. चाकरमानी असो किंवा पर्यटक भेट म्हणून कोकणातून खाजा, लाडू, काजू या भेटू वस्तू हमखास नेतात. याच खाजा, लाडू बनवण्याच्या घरगुती व्यवसायातून एक तरुण लाखोंची उलाढाल करत आहे.
advertisement
1/5

निलेश शेट्टी हा सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील व्यावसायिक आहे. 25 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी घरगुती स्वरुपात खाजा, लाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. हे पदार्थ बनवून ते स्वत: विकत होते. पुढे निलेशनेही नोकरी न करता वडिलांचाच व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/5
घरगुती स्वरुपात सुरू झालेल्या या व्यवसायाला आता फॅक्टरीचे स्वरुप आले आहे. गुळाचा खाजा, सर्व प्रकारचे लाडू, साखर खाजा, शेव आदी पदार्थांना मोठी मागणी आहे. निलेशच्या म्हणण्यानुसार, हा व्यावसाय वडिलांनी सुरू केला. तेव्हा खाजा, लाडू या पदार्थांना मोठी मागणी होती. त्यामुळेच या व्यवसायात उतरण्याची इच्छा झाली.
advertisement
3/5
निलेशने जत्रेमध्ये स्वतः खाजे विकले. नंतर काही वर्षांनी त्यात बदल करत गेला. पुढे व्यापारी देखील होलेसेल दरात त्याच्याकडे लाडूंची मागणी करू लागले. त्यामुळे हळू हळू त्याचा व्यावसाय वाढवून आज त्याचं रूपांतर फॅक्टरीत झालं आहे.
advertisement
4/5
आता लाडू, खाजा आणि इतर खाद्य पदार्थांची सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच बाहेर देखील विक्री होते. हे पदार्थ होलसेल दरात मिळत असल्याने मागणी वाढली आहे. खाजा 20 रुपये पॅकेट, लाडू 40 रुपये पॅकेट, शेव लाडू 20 रुपये पॅकेट, चिवडा 25 रुपये पॅकेट अशी विक्री होते.
advertisement
5/5
सुरुवातीस छोट्या प्रमाणात सुरू केलेला व्यावसाय आज फॅक्टरीच्या रूपात पाहायला मिळत असून या व्यवसायाने 25-30 जणांना रोजगार मिळाला आहे. तसेच या व्यवसायातून वर्षाकाठी 70-80 लाखांची उलाढाल होते. त्यातून 15-20 लाखांपर्यंत नफा राहत असल्याचंही निलेश सांगतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Food business: कोकणी खाजा अन् लाडूंची कमाल, सिंधुदुर्गचा तरुण करतोय 80 लाखांची उलाढाल