TRENDING:

Pune News: पुण्यात नवलेपाठोपाठ आणखी एक भीषण अपघात, एकमेकांना धडकल्या 7 गाड्या, PHOTO

Last Updated:
पुण्यात येरवडा गोल्फ चौक उड्डाणपूलजवळ ६ ते ७ वाहनांची साखळी धडक झाली, १० ते १२ जण किरकोळ जखमी, मोठी वाहतूक कोंडी व गाड्यांचे नुकसान झाले.
advertisement
1/6
पुण्यात नवलेपाठोपाठ आणखी एक भीषण अपघात, एकमेकांना धडकल्या 7 गाड्या, PHOTO
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यामध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. नवले ब्रिजवरील अपघातानंतर आता पुण्यात पुन्हा विचित्र अपघात झाला आहे.
advertisement
2/6
६ ते ७ वाहनांची विचित्र धडक झाली. यामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालं. इतकंच नाही तर काही काळासाठी वाहतूक कोंडीही झाली होती. पुण्यामध्ये अपघातांची मालिका सुरूच असून, आज पुन्हा एकदा शहरात एक विचित्र अपघात घडला आहे.
advertisement
3/6
येरवड्यातील गोल्फ चौक उड्डाणपूल नजीक सहा ते सात वाहने एकाच वेळी एकमेकांना धडकल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
advertisement
4/6
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही वाहने एकामागोमाग एक धडकल्यामुळे हा अपघात इतका मोठा झाला. अचानक ब्रेक दाबल्याने किंवा अन्य कोणत्या कारणामुळे वाहनांच्या चालकांचे नियंत्रण सुटले आणि ही साखळी दुर्घटना घडली.
advertisement
5/6
सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या दुर्घटनेत १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे या परिसरात काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
advertisement
6/6
या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास येरवडा पोलीस करत आहेत. उड्डाणपुलाजवळ झालेला हा विचित्र अपघात पुण्याच्या वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. गाड्या एकमेकांवर जोरात धडकल्या, काही कार तर एकमेकांमध्ये घुसल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Pune News: पुण्यात नवलेपाठोपाठ आणखी एक भीषण अपघात, एकमेकांना धडकल्या 7 गाड्या, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल