TRENDING:

अधिवेशन सुरू असतानाच अजित पवार दिल्लीत, शरद पवारांच्या बंगल्यावर दिग्गज नेते पोहोचले

Last Updated:
इंडिया आघाडीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक मंत्री आणि नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
advertisement
1/5
अधिवेशन सुरू असताना अजित पवार दिल्लीत, शरद पवारांच्या बंगल्यावर दिग्गज नेते
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची जोरदार चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली आहे.
advertisement
2/5
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनांचे आयोजन केले गेले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसह केंद्रातील नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. इंडिया आघाडीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक मंत्री आणि नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
advertisement
3/5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, त्यांच्या भगिनी खासदार प्रियांका गांधी, पीसी चाको, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नवनीत बिट्टू, काँग्रेस नेते मनीष तिवारी, टी डी पी नेते सौगत राय, काँग्रेस नेते कमल नाथ, माजी मंत्री डी पुरंदरेश्वरी यांची उपस्थिती आहे.
advertisement
4/5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार देखील नागपुराहून दिल्लीत दाखल झाले आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना अधिवेशन काळात अजित पवार यांचे दिल्लीला जाणे, अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जाते. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल देखील आहेत.
advertisement
5/5
माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, अमर काळे, निलेश लंके, खासदार भगरे गुरूजी, बाळ्या मामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
अधिवेशन सुरू असतानाच अजित पवार दिल्लीत, शरद पवारांच्या बंगल्यावर दिग्गज नेते पोहोचले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल