आजपासून रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू, धान्य वितरणाच्या अटी काय असणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ration Card New Rules : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे.
advertisement
1/5

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदूळ व गहू यांच्या प्रमाणात बदल करत, आज १ जानेवारी २०२६ पासून नवे वितरण निकष लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारक कुटुंबांवर होणार असून, अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
advertisement
2/5
नव्या आदेशानुसार, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा प्रती कार्ड २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दिला जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रत्येक सदस्याला दरमहा ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू मिळणार आहे. हे वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदींनुसारच करण्यात येत असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
3/5
गेल्या काही महिन्यांत धान्य वितरणाच्या प्रमाणात तात्पुरते बदल करण्यात आले होते. त्या काळात अंत्योदय लाभार्थ्यांना २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना ४ किलो तांदूळ आणि १ किलो गहू देण्यात येत होते. या बदलामुळे तांदळाचे प्रमाण वाढले असले, तरी गव्हाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले होते.
advertisement
4/5
या निर्णयावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही भागांत तांदळाची मागणी अधिक असल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र गहू कमी मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना रोजच्या आहारात अडचणी जाणवल्या. विशेषतः गहू जास्त वापरणाऱ्या भागांत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने पुन्हा एकदा मूळ वितरण पद्धतीकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
5/5
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन - रास्त दर दुकानांवर होणारे धान्य वितरण नव्या प्रमाणानुसार नियोजित करण्यात येणार असल्याने, लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेवरील सदस्यसंख्या, पात्रता आणि मिळणाऱ्या धान्याचे प्रमाण तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही गैरसमज टाळण्यासाठी वेळेत माहिती घेणे आवश्यक असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आजपासून रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू, धान्य वितरणाच्या अटी काय असणार?