Ratnagiri Ganesh Visarjan : रत्नागिरीमध्ये बाप्पाच्या विसर्जनात मगरीचे विघ्न? फोडावे लागतायेत फटाक्यांचे बॉम्ब, पाहा PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ratnagiri Ganesh Visarjan : रत्नागिरी येथील जगबुडी नदीत महाकाय मगरींचा वावर असल्याने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात अडचण येत आहेत. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)
advertisement
1/6

आज राज्यभर दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्येही गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहचला आहे. मात्र, बाप्पाच्या विसर्जनात इथं मगरींचं विघ्न निर्माण झालं आहे.
advertisement
2/6
खेड येथील जगबुडी नदीमध्ये मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने विसर्जन करताना अडचण येत आहे.
advertisement
3/6
गणरायाचे जगबुडी नदीमध्ये विसर्जन करणारी विसर्जन कट्टा ह्या सामाजिक संस्थेच्या सदस्यांकडून जगबुडी नदीपात्रात असणाऱ्या महाकाय मगरींना पिटाळून लावण्यासाठी नदीपात्रात अक्षरशः फटाक्यांचे बॉम्ब फोडण्यात आले.
advertisement
4/6
गणपती विसर्जनावेळी नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करणाऱ्या विसर्जन कट्टा या संस्थेच्या सदस्यांना महाकाय मगरींमुळे काही दुखापत होऊ नये.
advertisement
5/6
तसेच कोणता अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नदीत फटाक्यांचे बॉम्ब फोडण्याची उपाययोजना विसर्जन कट्टा संस्थेकडून केली जात आहे.
advertisement
6/6
किमान गणपती विसर्जनावेळी तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी गणेशभक्तांकडून होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ratnagiri Ganesh Visarjan : रत्नागिरीमध्ये बाप्पाच्या विसर्जनात मगरीचे विघ्न? फोडावे लागतायेत फटाक्यांचे बॉम्ब, पाहा PHOTO