Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा तडाखा! केळशी गाव तिहेरी संकटात, पुराचा विळखा, दरडही कोसळली
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला पावसाचा जबरदस्त तडाखा बसला असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (शिवाजी गोरे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावात पावसाने हाहाकार माजवला असून केळशी गाव पूर्णपणे जलमय झाले आहे. गावाच्या एका बाजूला अथांग अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला डोंगर या दोन्हीच्या मध्यभागी असलेल्या तुळशी गावाला पावसाने जबरदस्त फटका दिला.
advertisement
2/5
आज सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी गावातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तर दुसरीकडे या गावाला दरडीपासून धोका निर्माण झाला आहे.
advertisement
3/5
केळशी गावातील नवानगर व कुंभारवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
4/5
तसेच या गावातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले असून यावा गावातील रस्त्यावर सुमारे अडीच ते तीन फूट पाणी वाहताना दिसत आहेत.
advertisement
5/5
केळशी गावातील नवानगर वस्ती शेजारी असलेल्या डोंगराच्या दरडीचा एक भाग कोसळल्याने शेजारी असणाऱ्या मानवी लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. केळशी गावात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नवानगर वस्तीला दरडीचा धोका निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा तडाखा! केळशी गाव तिहेरी संकटात, पुराचा विळखा, दरडही कोसळली