Ratnagiri News : सावित्री नदीवरील पिलरचा काही भाग कोसळला; 12 कामगार थोडक्यात वाचले, पाहा PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या खांबाचा (पिलर) काही भाग कोसळल्याने मोठा अपघात घडला. (शिवाजी गोरे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

सावित्री नदीवरील रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जोडणारा मुंबईसाठी जवळचा मार्ग असलेल्या म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
advertisement
2/5
आज सायंकाळी काम सुरू असताना अचानक पिलरचा स्लॅब कोसळला. सुदैवाने कामगार बाजूला सरकल्याने जीवितहानी टळली. या अपघातात 12 कामगार बचावल्याची चर्चा सुरू आहे.
advertisement
3/5
सावित्री नदीवरील पुलाचे काही पिलर कलल्याने धोका निर्माण झाला होता, त्यामुळे या पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून बंद आहे.
advertisement
4/5
सावित्री नदीवरील ब्रीजच्या दुरुस्तीच्या कामाला कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, पुल वाहतुकीस धोकादायक बनल्याने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
advertisement
5/5
मुंबई, पुणे चाकरमान्याची गणपतीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गणपतीपूर्वी ब्रिज वाहतुकीला खुला करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ratnagiri News : सावित्री नदीवरील पिलरचा काही भाग कोसळला; 12 कामगार थोडक्यात वाचले, पाहा PHOTO