ना खिशात पैसा-ना राहायला घर, तरी मातब्बर नेत्याला पाजलं पाणी, लोकांनी वर्गणी काढून निवडून आणला, 15 वर्षांचा गड काबीज
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
यवतमाळच्या नेर येथील एका उमेदवाराने कोणतंही राजकीय पाठबळ नसताना, लोक वर्गणीतून मिळणाऱ्या पैशातून विजय खेचून आणला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात हा विजय संपादन केला आहे.
advertisement
1/9

राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत लाखो रुपये खर्च करून निवडणूक लढणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
advertisement
2/9
यवतमाळच्या नेर येथील एका उमेदवाराने कोणतंही राजकीय पाठबळ नसताना, लोक वर्गणीतून मिळणाऱ्या पैशातून विजय खेचून आणला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात हा विजय संपादन केला आहे.
advertisement
3/9
सचिन उर्फ जांभा कैलास कराळे असं या उमेदवाराचं नाव आहे. कसलेही राजकीय पाठबळ नसताना, खिशात पैसे नसताना, स्वतःचं बँक पासबुकही नसताना, केवळ लोकवर्गणीच्या पैशांतून कराळे यांनी विजय खेचून आणला आहे. या तरुणाने प्रस्थापितांना धूळ चारत हा ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.
advertisement
4/9
सचिन कराळे यांची ओळख नेरमध्ये एक 'निस्वार्थी कार्यकर्ता' म्हणून आहे. स्वतःची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची, घरची गरिबी पाचवीला पुजलेली आणि स्वतःचे हक्काचं घरही नाही.
advertisement
5/9
अशा परिस्थितीत कधी दवाखान्यात तर कधी मित्राच्या हॉटेलमध्ये मुक्काम करून जांभाने गेली अनेक वर्षे जनसेवा केली. विशेषतः रुग्णसेवेसाठी तो २४ तास उपलब्ध असतो. याच कामाची पावती नेरच्या जनतेने त्याला दिली.
advertisement
6/9
नेरच्या प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या जांभासमोर साधेसुधे आव्हान नव्हते. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सुभाष भोयर हे त्यांच्या विरोधात होते. भोयर हे १५ वर्षे नगरसेवक राहिलेले आणि राजकारणातील मोठा अनुभव असलेले मातब्बर नेते होते.
advertisement
7/9
जांभासाठी नेरच्या सामान्य जनतेने स्वतःहून लोकवर्गणी गोळा केली. मित्रांनी त्याला निवडणूक लढवण्यासाठी कपडे शिवून दिले. 'निवडणूक ही धनाने नाही तर जनतेच्या मनाने लढली जाते’, हे जांभाच्या विजयानं सिद्ध केले.
advertisement
8/9
१५ वर्षे नरसेवक राहिलेल्या एका मातब्बर नेत्याला सामान्य कार्यकर्त्याने हरवल्याने संपूर्ण यवतमाळमध्ये त्याच्या विजयाची चर्चा आहे.
advertisement
9/9
खरं तर, जांभा हा भाजपचा कार्यकर्ता आहे. मागील अनेक वर्षांपासून तो भाजपसाठी काम करत आहे. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षानं त्याला संधी नाकारली. यामुळे त्याने अपक्ष निवडणूक लढवत शिवसेना शिंदे गटाचा पराभव केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ना खिशात पैसा-ना राहायला घर, तरी मातब्बर नेत्याला पाजलं पाणी, लोकांनी वर्गणी काढून निवडून आणला, 15 वर्षांचा गड काबीज