TRENDING:

दुष्काळी गावात मक्याची कमाल; एकरी 60 क्विंटल माल, 4 महिन्यात शेतकरी मालामाल!

Last Updated:
महाराष्ट्रातील सांगल जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात असणारं अग्रण धुळगाव हे मका हब म्हणून प्रसिद्ध झालंय. येथील शेतकरी एका एकरात 60 क्विंटलचं उत्पादन घेत आहेत.
advertisement
1/7
दुष्काळी गावात मक्याची कमाल; एकरी 60 क्विंटल माल, 4 महिन्यात शेतकरी मालामाल!
मानवी आहाराबरोबरच कुक्कुटपालनातील वापरामुळे मका या नगदी पिकास बारमाही मागणी असते. या पिकापासून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. बाजारपेठेतील मागणी आणि दुष्काळी भागातही उत्पादनाच्या हमीमुळे अनेक शेतकरी मक्याची शेती करतात.<a href="https://news18marathi.com/maharashtra/sangli/"> सांगली जिल्ह्यात</a> मक्याचं गाव म्हणूनच कवठेमहांकाळ भागातील अग्रण धुळगावची ओळख आहे.
advertisement
2/7
अग्रण धुळगाव येथील शेतकरी केवळ मका उत्पादनाकडे वळले आहेत. त्यामुळे या भागाला ‘मका हब’ म्हटलंय जातंय. येथील शेतकरी संभाजी खंडागळे यांनी तर एकरी 71.39 क्विंटल उत्पादन घेऊन देशात विक्रम नोंदवला आहे. तसेच त्यांना चार महिन्यांत एकरी दीड लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले.
advertisement
3/7
20218 पर्यंत गावाची ओळख दुष्काळी भाग अशीच होती. 2019 पासून अग्रणी नदी पुनर्जीवित झाल्यानंतर हळूहळू थोडाफार बदल होत गेला. 2020 पर्यंत मका पिकाचे उत्पादन एकरी 20 क्विंटल इतके होते. त्यामुळे मका पिकामध्ये कितीही कष्ट घेतले तरी जास्तीत जास्त एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळू शकते, असा लोकांचा समज होता.
advertisement
4/7
जून 2020 मध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अग्रण धुळगाव या गावचा वातावरणाबरोबरच भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला. उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ आणि तालुका कृषी अधिकारी एम. जे. तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकरी 60 क्विंटल मका घेण्यासाठी रणनीती आखण्यात आली. त्यासाठी 10 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.
advertisement
5/7
मका लागवडीसाठी आवश्यक जमिनीची पूर्वमशागत केली. खोलवर नांगरणी, दोन वेळा कुळवणी आणि माती भुसभुशीत होण्यासाठी एकवेळ रोटाव्हेटर मारण्यात आले. लागवडीसाठी संकरित वाण राशी 3499 निवडले. एकरी 20 किलो बियाणे वापरण्यात आले.
advertisement
6/7
मका उत्पादन घेताना पंचसूत्राचा अवलंब केल्यामुळे एकरी 60 क्विंटल उत्पादन शेतकऱ्याला घेणे सोपे जाऊ लागले. त्याचबरोबर एक गाव एक वाण या योजनेअंतर्गत अग्रण धुळगाव या गावाने मक्याचे गाव म्हणून नव्याने आपली ओळख महाराष्ट्रभर निर्माण केली आहे. लागवडीच्या नवीन पद्धतीमुळे येथील शेतकरी एकरी 60 क्विंटल उत्पादन घेऊन चार महिन्यात सव्वा लाख रुपये उत्पादन घेत असल्याचे शेतकरी खंडागळे यांनी सांगितले.
advertisement
7/7
दरम्यान, सांगली जिल्ह्यात फूड इंडस्ट्रीसाठी मका खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची मागणी ही 50 हजार टनांची आहे. ही गरज भागवण्यासाठी बाहेरील राज्यांतून म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांतून मका खरेदी केला जातो. परंतु एकाच वाणाचा, रंग, आकार आणि गुणवत्तेचा मका मोठ्या प्रमाणावर एकाच गावातून मिळणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे लक्ष अग्रण धुळगावकडे लागले आणि ते जादा दराने मका स्वीकारण्यास तयार झाले. (शुभम बोडके, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सांगली/
दुष्काळी गावात मक्याची कमाल; एकरी 60 क्विंटल माल, 4 महिन्यात शेतकरी मालामाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल