शिकार आणि शिकारी दोघांचाही मृत्यू; वानर आणि बिबट्याचा गेला जीव, नेमकं काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
बिबट्या शिकार करायला येताच वानराच्या पिल्लाने त्याच्यापासून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी असं काही घडलं की बिबट्यापासून तर तो वाचला पण त्याला मृत्यूनं गाठलं. सोबत बिबट्यालाही नेलं. (सचिन जाधव, प्रतिनिधी)
advertisement
1/5

प्राण्यांच्या शिकारीचे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. साताऱ्यातील अशीच एक शिकारीची घटना समोर आली आहे. एक बिबट्या वानराच्या पिल्लाची शिकार करायला आला. वानराच्या पिल्लासह बिबट्याचाही मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
सातारा तालुक्यातील मौजे आसनगाव येथील राकुसलेवाडी गावामध्ये बिबट्या आणि वानराचं पिल्लू मृत अवस्थेत आढळलं आहे. बिबट्या वानराच्या पिल्लाची शिकार करायला आला होता. पण दोघांचाही मृत्यू कसा काय झाला?
advertisement
3/5
जिथं बिबट्या आणि माकड मृतावस्थेत आढळले तिथं विजेचा थांब आहे. वानराने बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी या खांबावर उडी मारली आणि त्याला शॉक लागला.
advertisement
4/5
वानरामागोमाग बिबट्याही त्याची शिकार करण्यासाठी म्हणून विजेच्या पोलवर गेला. विजेच्या डीपीला स्पर्श झाल्याने त्यालाही शॉक लागला. दोघंही तिथं मृतावस्थेत पडले.
advertisement
5/5
जानाई देवी मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावरती ही घटना घडली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळतात वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
शिकार आणि शिकारी दोघांचाही मृत्यू; वानर आणि बिबट्याचा गेला जीव, नेमकं काय घडलं?