महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसला 'व्हिनचॅट', नेमका कसा दिसतो हा पक्षी, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
महाराष्ट्रात प्रथमच व्हिनचॅट हा पक्षी आढळून आला आहे. व्हिनचॅट हा गवताळ अधिवासामध्ये स्थलांतर करणारा पक्षी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचऱ्यामधील पक्षी निरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदूम हे देवगडमध्ये पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा पक्षी दिसला. जाणून घेऊयात, याचबाबतची अधिक माहिती. (सितराज परब/सिंधुदुर्ग, प्रतिनिधी)
advertisement
1/6

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचऱ्यामधील पक्षी निरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदूम हे देवगडमध्ये पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा पक्षी दिसला.
advertisement
2/6
गप्पीदास पक्ष्यापेक्षा या पक्ष्याच्या पाठीवरील रंग आणि आकार वेगळा जाणवल्याने त्यांनी लगेच त्याची छायाचित्रे टिपली आणि पक्षीतज्त्र आदेश शिवकर यांच्या माध्यमातून त्याची ओळख पटवून घेतली.
advertisement
3/6
गप्पीदासपेक्षा व्हिनचॅटच्या छातीचा रंग हा केसरी असून पोटाच्या भागाकडील पांढरा रंग हा त्यामध्ये मिसळलेला असतो. याशिवाय त्याची शेपूट आखूड आणि तिच्या बाहेरील कडा या पांढऱ्या रंगाच्या असतात.
advertisement
4/6
तसेच डोळ्याच्या वर दिसेल आणि जाणवेल असा पांढरा पट्टा असल्याची माहिती आदेश शिवकर यांनी दिली. महाराष्ट्रामधील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
5/6
पक्षी निरीक्षणावेळी पहिल्यांदा हा पक्षी पाहिल्यानंतर तो पाठमोरा असल्याने त्याच्या वेगळेपणाची जाणीव झाली नव्हती.
advertisement
6/6
मात्र, त्याने मान वळवून आमच्याकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील रचनेमुळे हा पक्षी गप्पीदास पक्ष्यापेक्षा वेगळा असल्याचे जाणवले, असे ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सिंधुदुर्ग/
महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसला 'व्हिनचॅट', नेमका कसा दिसतो हा पक्षी, photos