TRENDING:

Sinhagad Fort: सिंहगडावर फिरायला जाताय? किल्ल्यावरील 'ही' ठिकाणं आवर्जून बघावीत

Last Updated:
हिरव्यागार झाडांनी नटलेला हा किल्ला पर्यटकांना जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा भासतो. शनिवार-रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस, पुणे आणि आसपासच्या भागातून हजारो पर्यटक येथे गर्दी करताना दिसतात. गिर्यारोहणाची आवड, ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याची उत्सुकता आणि निसर्गाचा आनंद घेण्याची ओढ असलेल्यांना सिंहगड किल्ला आकर्षित करत राहतो. या किल्ल्यावर काही ठिकाणं अशी आहेत जी प्रत्येकाने आवर्जून बघितली पाहिजेत.
advertisement
1/9
सिंहगडावर फिरायला जाताय? किल्ल्यावरील 'ही' ठिकाणं आवर्जून बघावीत
हिरव्यागार झाडांनी नटलेला हा किल्ला पर्यटकांना जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा भासतो. शनिवार-रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस, पुणे आणि आसपासच्या भागातून हजारो पर्यटक येथे गर्दी करताना दिसतात.
advertisement
2/9
गिर्यारोहणाची आवड, ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याची उत्सुकता आणि निसर्गाचा आनंद घेण्याची ओढ असलेल्यांना सिंहगड किल्ला आकर्षित करत राहतो. या किल्ल्यावर काही ठिकाणं अशी आहेत जी प्रत्येकाने आवर्जून बघितली पाहिजेत.
advertisement
3/9
द्रोणागिरीच्या कड्यावरून तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी सिंहगड सर केला होता. बखरींमध्ये या कड्याचा उल्लेख आहे. गिर्यारोहकांना आजही हा कडा पाहताना त्या ऐतिहासिक क्षणांची आठवण येते.
advertisement
4/9
किल्ल्यावरील प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेला कलावंतीण बुरूज देखील महत्त्वाचं ठिकाण आहे. या बुरूजातून संपूर्ण परिसराचा नजारा डोळ्यांत साठवता येतो.
advertisement
5/9
सिंहगडाच्या लढाईदरम्यान तानाजी मालुसरे यांचा हात तुटल्याची आख्यायिका सांगितली जाते. हात तुटलेलं हे ठिकाण पर्यटकांना इतिहासाशी जोडते.
advertisement
6/9
कल्याण दरवाजा हा गडावर जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. भक्कम तटबंदी आणि शिल्पकलेमुळे हा दरवाजा पर्यटकांना आकर्षित करतो.
advertisement
7/9
झुंजर बुरुज किल्याच्या संरक्षणासाठी बांधलेला हा बुरूज अतिशय भक्कम आहे. या बुरुजाने आक्रमकांपासून सिंहगडाचं संरक्षण केलेलं आहे.
advertisement
8/9
छत्रपती राजाराम महाराजांनी याच किल्ल्यावर प्राण सोडले होते. त्यांच्या स्मृतीस्थळामुळे सिंहगडाचे महत्व अधिकच वाढते.
advertisement
9/9
शिवभक्तांसाठी कोंढाणेश्वर मंदिर ठिकाण विशेष महत्त्वाचं आहे. या मंदिरातील शांत वातावरण आणि धार्मिक स्पर्श पर्यटकांना मनःशांती देतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sinhagad Fort: सिंहगडावर फिरायला जाताय? किल्ल्यावरील 'ही' ठिकाणं आवर्जून बघावीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल