Chunky Pandey Love Story: नाइट क्लबमध्ये भेट अन् एअर होस्टेसच्या प्रेमात पडले चंकी पांडे, अशी सुरु झालेली लव्हस्टोरी!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Chunky Pandey Love Story: बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आणि त्याची पत्नी भावना पांडे हे आज इंडस्ट्रीतील एक लव्हेबल कपल मानले जाते. पण या प्रेमकथेचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे आणि त्याची पत्नी भावना पांडे हे आज इंडस्ट्रीतील एक लव्हेबल कपल मानले जाते. पण या प्रेमकथेचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. चंकी आणि भावनाची लव्हस्टोरी कशी सुरु झाली? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
भावना आणि चंकी यांचे लग्न 1998 मध्ये झाले आणि त्यांना अनन्या आणि रायसा या दोन मुली आहेत. भावना आणि चंकीची प्रेमकहाणी खरोखरच गोंडस आहे. लग्न करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
advertisement
3/7
रेडिओ नशाला दिलेल्या एका मुलाखतीत भावनाने सांगितले की, मी 13 वर्षांची असताना पहिल्यांदा चंकीला पाहिलं होतं. तेव्हा तिने चंकी पांडेचा “आग ही आग” हा पहिला चित्रपट पाहिला.
advertisement
4/7
तिच्या सोसायटीत राहणाऱ्या एका मुलीला अभिनेत्री व्हायचं होतं, आणि ती अनेकदा मासिकातून चंकीचे पोस्टर्स आणायची. भावना म्हणते, "मी माझ्या खोलीत देखील त्याचं एक पोस्टर्स लावलं होतं. तो मला खूपच आवडला होता."
advertisement
5/7
काही वर्षांनी कॉलेज संपल्यावर, भावना सुट्टीसाठी दिल्लीला गेली होती. एका नाइट क्लबमध्ये तिने पहिल्यांदा चंकीला प्रत्यक्ष पाहिले. भावना सांगते, "तो आला आणि फक्त हाय म्हणाला. मी पण हाय म्हटलं आणि तो निघून गेला." पण नंतर आम्ही डान्स केला, गप्पा मारल्या. त्याने माझा नंबर मागितला, पण मी खोटा नंबर दिला कारण घरी फोन यायला नको होते." भावना त्या वेळी एअर होस्टेस होती. आंतरराष्ट्रीय कॉल्स खूप महाग होते. तरीही ती पैसे वाचवून चंकीशी बोलत असे.
advertisement
6/7
एका जेवणाच्या भेटीवेळी चंकीने अचानक तिला म्हटलं, "आपण भेटायला पैसे खर्च करतो, त्यापेक्षा लग्न करुया." सुरुवातीला भावनाने हा प्रस्ताव नाकारला, पण नंतर ती तयार झाली. मात्र तिचं एकच म्हणणं होतं, "आधी माझ्या आई-वडिलांची परवानगी घ्या."
advertisement
7/7
भावनाचे वडील या नात्याला तयार नव्हते. त्यांनी एका मुलाखतीत वाचले होते की चंकी पांडे कॅसानोव्हा आहे. त्यामुळे त्यांना मुलीचं लग्न अशा व्यक्तीशी करायचं नव्हतं. बऱ्याच समजावणुकीनंतर अखेर त्यांनी होकार दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Chunky Pandey Love Story: नाइट क्लबमध्ये भेट अन् एअर होस्टेसच्या प्रेमात पडले चंकी पांडे, अशी सुरु झालेली लव्हस्टोरी!