आधी आनंद दिघेंच्या पुतळा नंतर देवीची आरती, रश्मी ठाकरेंचे ठाण्यातील टेंभी नाक्यावरील PHOTOS
- Published by:Sachin S
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
ठाण्यातील टेंभीनाका इथं दुर्गेश्वरी देवीची पूजा करण्यासाठी दरवर्षी रश्मी ठाकरे येत असतात. या वर्षी सुद्धा रश्मी ठाकरे यांनी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवीची आरती केली. (अजित मांढरे, प्रतिनिधी)
advertisement
1/8

देशभरात नवरात्रीचा उत्सवाची धूम सुरू आहे. महाराष्ट्रातही नवरात्रीनिमित्ताने उत्साहाचं वातावरण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात दरवर्षीप्रमाणे ठेंभीनाका इथं दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाका इथं जाऊन देवीची आरती केली.
advertisement
2/8
ठाण्यातील टेंभीनाका इथं दुर्गेश्वरी देवीची पूजा करण्यासाठी दरवर्षी रश्मी ठाकरे येत असतात. या वर्षी सुद्धा रश्मी ठाकरे यांनी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवीची आरती केली.
advertisement
3/8
यावेळी रश्मी ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते राजन विचारे सुद्धा उपस्थितीत होते. देवीची आरती करण्याआधी रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्यावर जाऊन पुष्पहार अर्पण केला. आनंद दिघे यांनीच टेंभी नाक्यावर दुर्गेश्वरी देवीची प्रतिष्ठापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात केली होती.
advertisement
4/8
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मागील वर्षी रश्मी ठाकरे आल्या होत्या, त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
advertisement
5/8
पण, यावेळी असा शिंदे गटाच्या महिला कार्यकर्ता आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद झाला नाही.
advertisement
6/8
- रश्मी ठाकरे येणार त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला मोठ्या प्रमाणात मंडपात उपस्थितीत होत्या.
advertisement
7/8
दरम्यान, त्यांना नितिमत्ता नाहीये त्यामुळे त्यांनी गेल्या वेळेस देवीच्या शक्तीपिठाला राजकीय आखाडा बनवला होता. आम्ही त्यांना काहीही उत्तर देणार नाही. आम्ही नित्तिमत्ता सांभाळून आहोत, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दर्जा तथा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिली होती.
advertisement
8/8
- नवरात्रीमध्ये प्रत्येक घरामध्ये फुलाचार होतो. आमच्या रश्मी वहिनी या आनंद दिघेंनी देवी स्थापन झाली तेंव्हापासून आम्ही सर्व एकत्र येतो. आम्ही त्या निमित्ताने इथं येतो. आम्ही देवीचे दर्शन घेतो. देवीला साकडं घालायची गरज नाही, आईने दैत्यांचा वध केला अशा वृत्तींचा वध होत असतो, आईला सगळं माहिती आहे. 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच महापौर होणार आहे, असं यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आधी आनंद दिघेंच्या पुतळा नंतर देवीची आरती, रश्मी ठाकरेंचे ठाण्यातील टेंभी नाक्यावरील PHOTOS