TRENDING:

'तो माझ्याशी 10-15 मिनिट बोलला अन् माझं डोकंच फिरलं', शाहरुख खानबद्दल हे काय बोलून गेली स्वरा भास्कर?

Last Updated:
Swara Bhasker : स्वरा भास्करने ‘पती-पत्नी आणि पंगा’मध्ये शाहरुख खानसोबतचा एक किस्सा शेअर केला आहे.
advertisement
1/8
'त्याचं बोलणं ऐकून माझं डोकंच फिरलं', शाहरुखबद्दल हे काय बोलून गेली स्वरा भास्कर
मुंबई: बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या चित्रपटांपासून दूर असून, तिच्या दोन वर्षांच्या मुलीच्या संगोपनात व्यस्त आहे.
advertisement
2/8
पण, ती नुकतीच तिच्या पतीसोबत ‘पती-पत्नी आणि पंगा’ या टीव्ही रियालिटी शोमध्ये दिसली, जिथे तिने शाहरुख खानसोबतचा एक खूपच मजेदार किस्सा सांगितला, ज्यामुळे सगळेच थक्क झाले.
advertisement
3/8
कलर्स टीव्हीने या शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यात स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद दिसत आहेत.
advertisement
4/8
या शोमध्ये स्पर्धकांना एक प्रश्न विचारला जातो की, ‘शाहरुख खानला कोणी त्रास दिला होता?’ त्यावर सगळेच हिना खानचं नाव घेतात, पण नंतर स्वरा सांगते की, ती गोष्ट तिने केली होती.
advertisement
5/8
स्वरा गुपित उघड करताना म्हणाली, “माझ्यासोबत असं होतं की, जेव्हा शाहरुख माझ्यासमोर येतो, तेव्हा मी वेडी होऊन जाते.”
advertisement
6/8
ती पुढे म्हणाली, “२०१७-१८ मध्ये ‘झीरो’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. एकदा शाहरुख माझ्याशी १०-१५ मिनिटं बोलला, आणि माझं डोकंच फिरलं. मला काय करावं, हेच समजेना.”
advertisement
7/8
स्वरा भास्कर पुढे हसत-हसत म्हणाली, “मी शाहरुख खानला सोडलंच नाही. मी त्याला त्रास देत होते आणि त्याच्या वडिलांच्या महानतेबद्दल सांगत होते. मी त्याला सांगत होते की, ‘पार्टीशननंतर तुमचे वडील भारतात आले होते, ते किती महान होते!’ तो बिचारा ‘अच्छा-अच्छा’ असं बोलत होता आणि मी त्याला सोडलंच नाही.”
advertisement
8/8
स्वराने सांगितलं की, तिला नेहमीच शाहरुख खानसारखं इंडस्ट्रीवर राज्य करायचं होतं. त्यामुळे तिच्यासाठी तो एक आदर्श आहे. तिने त्याला पाहूनच चित्रपटांमध्ये यायचा निर्णय घेतला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तो माझ्याशी 10-15 मिनिट बोलला अन् माझं डोकंच फिरलं', शाहरुख खानबद्दल हे काय बोलून गेली स्वरा भास्कर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल