Solapur Accident : सोलापुरात सिमेंट वाहतूक करणारा बलगर उलटला, 4 ठार, CM शिंदेंकडून गंभीर दखल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यात औज आहेरवाडी येथे सिमेंट वाहतूक करणारा बलगर पलटी झाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला.
advertisement
1/5

सोलापूर जिल्ह्यात औज आहेरवाडी येथे सिमेंट वाहतूक करणारा बलगर पलटी झाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
advertisement
2/5
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज आहेरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील बस स्टॉपवर सिमेंट वाहतूक करणारा बलगर अचानक पलटी झाला. या अपघातात औज गावातील विठ्ठल शिंगाडे (वय वर्षे 60), मुलगी प्रज्ञा दोडतले (वय वर्षे 12), महेश इंगळे (वय वर्षे 10), अनिल चौधरी (वय वर्षे 50) यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
3/5
औज दुर्घटनेतील मृतांना आर्थिक मदत देऊन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी फोनवरून घटनेचा आढावा घेतला.
advertisement
4/5
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख, जखमींना 50 हजार देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
advertisement
5/5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना हे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Accident : सोलापुरात सिमेंट वाहतूक करणारा बलगर उलटला, 4 ठार, CM शिंदेंकडून गंभीर दखल