ST Bus Accident: एसटी बसची केबिनच चक्काचूर झाली, चालकाचा जागेवरच मृत्यू, कोल्हापुरातील भीषण PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर महाराष्ट्राची एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर ३ प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. (ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी )
advertisement
1/6

कोल्हापूरच्या सिमेवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर महाराष्ट्राची एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर ३ प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. अनेक प्रवाशी जखमी असून नजिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
2/6
मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातल्या सुपे इथं दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त एसटी महामंडळाची बस ही चंदगड आगारमधील होती.
advertisement
3/6
एसटी बस महाराष्ट्राकडे येत होती. , चंदगड तालुक्यातल्या सुपे इथं पोहोचली असता भरधाव ट्रकने बसला धडक दिली.
advertisement
4/6
ही धडक इतकी भीषण होती की, बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात एसटी बसचालकाचा जागेवरच मृत्यू झाला.
advertisement
5/6
लक्ष्मण हळदणकर असं मृत एसटी बस चालकाचं नाव आहे. एसटी चालकाचा जागेवर मृत्यू तर तीन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
advertisement
6/6
अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी प्रवाशांना बेळगावमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ST Bus Accident: एसटी बसची केबिनच चक्काचूर झाली, चालकाचा जागेवरच मृत्यू, कोल्हापुरातील भीषण PHOTOS