TRENDING:

नोकरीचा राजीनामा दिला, तरुण आता दिवसाला कमवतोय 16 हजार; असं काय केलं?

Last Updated:
दांडगे धाडस दाखवत पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देत सांगलीच्या ग्रामीण भागातील सुरजने हॉटेल व्यवसाय स्वीकारला आहे. पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा ते यशस्वी हॉटेल व्यवसायिक होण्याचा खडतर प्रवास ऐकुया जिद्दी हाॅटेल व्यवसायिक सुरज वंजारी यांच्याकडून लोकल18ने जाणून घेतला.
advertisement
1/7
नोकरीचा राजीनामा दिला, तरुण आता दिवसाला कमवतोय 16 हजार; असं काय केलं?
पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देत सांगलीच्या ग्रामीण भागातील सुरजने हॉटेल व्यवसाय स्वीकारला आहे. पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा ते यशस्वी हॉटेल व्यावसायिक होण्याचा खडतर प्रवास ऐकूया.
advertisement
2/7
सुरज वंजारी हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नेर्ले गावाच्या सामान्य अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील धाकटा मुलगा. अल्पभूधारकांची मुले शिकली तरच त्यांना चांगले दिवस पाहायला मिळतील. हे लक्षात घेत सुरज यांच्या आई-वडिलांनी मुलांना चांगले शिक्षण दिले.
advertisement
3/7
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत मुले देखील चांगली शिकली. पुढे सुरज यांच्या मोठ्या भावाने पोलीस भरतीतून सरकारी नोकरी मिळवली. त्यावेळच्या ट्रेंडनुसार सुरज यांनी बीएससी केमिस्ट्रीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच पोलीस दलामध्ये असलेल्या भावाच्या मार्गदर्शनाने सुरज यांनी स्पर्धा परीक्षांची, पोलीस भरतीची तयारी केली.
advertisement
4/7
स्पर्धा परीक्षेतील अनिश्चितता लक्षात घेऊन सुरज यांनी बीएस्सीच्या शिक्षणावर खाजगी कंपनीत जॉब पाहिला. मिरज परिसरामध्ये त्यांनी नऊ हजार पगारावर दोन महिने जॉब देखील केला. परंतु नोकरीच्या वास्तवाचा अनुभव घेऊन सुरज यांनी व्यवसाय क्षेत्रात करिअरचा विचार केला.
advertisement
5/7
2018 साठी खाजगी कंपनीतील नोकरी सोडून सुरज यांनी हॉटेल व्यवसाय निवडला. सुरुवातीला मित्रमंडळींनी पुण्यामध्ये हॉटेलसाठी पॉईंट पाहिला. आई-वडिलांनी अत्यंत तडजोडीने हॉटेलसाठी भांडवल उपलब्ध करून दिले होते.
advertisement
6/7
पुण्यासारख्या ठिकाणी प्रचंड स्पर्धा असलेल्या व्यवसायात सुरुवातीला फारसे कस्टमर मिळाले नाहीत. नव्या व्यवसायाला दोन-तीन महिने होताच कोरोना महामारीने लॉकडाऊन झाले. एक-दोन महिने म्हणता-म्हणता जवळपास दोन वर्ष लॉकडाऊन सदृश्य स्थिती राहिल्याने दोन वर्ष सुरज गावी परतले होते.
advertisement
7/7
डोक्यावर बारा लाखांचा कर्जाचा डोंगर होता. हाती फारसे काही शिल्लक नव्हते. होती ती केवळ बाप-लेकांची एकी. घरच्यांना विश्वासात घेऊन कोरोना नंतर पुन्हा एकदा हॉटेल क्षेत्रातच अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द कायम ठेवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
नोकरीचा राजीनामा दिला, तरुण आता दिवसाला कमवतोय 16 हजार; असं काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल