TRENDING:

डोंबिवलीकर तरुणाचा अनोखा छंद, हेमा मालिनीसह अनेक सेलिब्रिटींना भूरळ

Last Updated:
डोंबिवलीतील तरुणाच्या केलेने हेमा मालिनीसह अनेक सेलिब्रिटींना भूरळ घातलीय. मालिकांच्या सेटवर आणि मोठ्या कार्यक्रमात उमेश पांचाळ सुंदर रांगोळी रेखाटतोय.
advertisement
1/9
डोंबिवलीकर तरुणाचा अनोखा छंद, हेमा मालिनीसह अनेक सेलिब्रिटींना भूरळ
कला ही माणसाकडे उपजत असावी लागते. कलाकार माणूस त्याच्या कलेमुळे श्रीमंत असतो असं म्हटलं जातं. डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार झाले. यापैकीच एक प्रसिद्ध नाव म्हणजे उमेश पांचाळ होय.
advertisement
2/9
एक उत्तम सुलेखनकार, रांगोळीकार आणि कथ्थक नर्तक म्हणून त्याची ओळख आहे. विशेष म्हणजे त्याने काढलेल्या रांगोळ्यांनी थेट हेमा मालिनी, झाकीर हुसेन यांसारख्या सेलिब्रिटीजना देखील आकर्षित केले आहे.
advertisement
3/9
सुरुवातीपासूनच आई, आजी, मामा या सगळ्यांचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर होते. त्यांचे पाहून मलाही ती सवय झाली. त्यानंतर हळू हळू चित्रकलेतील आवड वाढू लागली. 10 वी आणि 12 वी झाल्यानंतर मी फाईन आर्ट्स मध्ये करियर करायचे ठरवलं आणि रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला, असं उमेश सांगतो.
advertisement
4/9
शिक्षण घेत असताना मी पोट्रेट रांगोळी काढायचो. हे पाहून महाविद्यालयातील एका मित्राने मला बालिका वधू या हिंदी सिरियलच्या सेटवर नेलं. सेटवर काढलेली ती माझी पहिली रांगोळी होती. त्यानंतर अनेक जाहिराती, मराठी मालिका आणि वाहिन्यांकडून मला फोन येऊ लागले आणि मी सेटवर रांगोळी काढायला जाऊ लागलो असे उमेश सांगतो.
advertisement
5/9
दुबई येथे जाऊन शेख यांची रांगोळी रेखाटली. तर वाघा बॉर्डर येथे जाऊन आमच्या 15 ते 16 जणांच्या टीमने रांगोळी रेखाटली आहे. यामुळे सैनिकांना झालेला आनंद मी शब्दात सांगू शकत नाही, असं उमेश सांगतो.
advertisement
6/9
डोंबिवलीतील गुढी पाडवा शोभयात्रा असो किंवा दिवाळी पहाटेला आम्ही डोंबिवलीतील रस्त्यांवर खुशीने रांगोळी काढतो. इतकंच नव्हे तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील मला रांगोळी काढण्यासाठी बोलावतात, असं देखील त्यानं सांगितलं.
advertisement
7/9
अखिल भरतीय संस्कार भारती रांगोळीचे शिबिर उमेशने केले आहे. त्यामुळे संस्कार भारतीचे काम करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान माझी ओळख माझ्या कथ्थकच्या गुरू वृषाली दाबके यांच्या बरोबर झाली. गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना नाचताना पाहिलं आणि आपणही ही कला आत्मसात करावी असं वाटल्याचं उमेश म्हणतो.
advertisement
8/9
वृषाली ताईला यासंदर्भात विचारले असता तिने होकार दिला आणि मी कथ्थक करायला सुरुवात केली. सध्या मी विशारद पूर्ण केले असून आता मी अलंकारची तयारी करत असल्याचे त्याने सांगितले.
advertisement
9/9
सुलेखनाचे शिक्षण मी अच्युत पालव आणि राम कस्तुरे यांच्याकडे शिकलो. त्यानंतर पेपरवर सराव करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रांगोळीमध्ये सुलेखन करण्यास सुरुवात केली आणि लोकांना ते आवडू लागले. सध्या रांगोळी काढतो मात्र कागदावर चित्र काढणे कमी झाले आहे. त्यामुळे यापुढे चित्र देखील काढायची आहेत, असे उमेश सांगतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ठाणे/
डोंबिवलीकर तरुणाचा अनोखा छंद, हेमा मालिनीसह अनेक सेलिब्रिटींना भूरळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल