विदर्भात कसे होते हरतालिकेचे विसर्जन, पाहा पूजेची पद्धत
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भात मोठ्या उत्साहात महिला वर्गाकडून हरतालिकेचे व्रत केले जाते. येथे हरतालिका विसर्जनाची अनोखी पद्धत आहे.
advertisement
1/9

दरवर्षी भाद्रपद महिन्यात महिला वर्गाकडून हरतालिकेचे व्रत केले जाते. हे व्रत महिलांसोबत कुमारिकाही करतात. आपल्या घरात किंवा सामूहिक पद्धतीनेही हरतालिकेची पूजा केली जाते. विदर्भात हे व्रत करण्याची एक वेगळी पद्धत आहे.
advertisement
2/9
हरतालिकेच्या आधी 11 दिवसापासूनच विदर्भात हरतालिका व्रताची तयारी सुरू होते. परड्यावर गौरी पेरणीला सुरुवात होते. आपली गौरी घनदाट उगवावी यासाठी महिला काळजी घेतात. यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी आणि इतर धान्यांची पेरणी केली जाते.
advertisement
3/9
पूजनाच्या दिवशी महिला एका टब मध्ये स्वच्छ पाणी घेऊन गौरीला आधी धुऊन घेतात. त्यानंतर परड्यावर हळदीची गौरी आणि रेतीची शिवलिंग काढतात.
advertisement
4/9
आदल्या दिवशीच महिला फळ आणि फुल झाडं असे सोळा प्रकारची 16-16 पाने धाग्यांनी बांधून ठेवतात. पूजनाच्या दिवशी ही पाने वापरतात. हरतालिकेची विधिवत पूजा मांडून आरती केली जाते.
advertisement
5/9
परड्यावर उगवलेल्या घनदाट गौरीला धागा गुंडाळून हळदी कुंकू आणि रंगीबेरंगी फुले, हार तसेच 16 प्रकारच्या झाडांची पाने वाहिली जातात. तर शिवलिंगाला पांढरे अक्षदा आणि फुले वाहिली जातात.
advertisement
6/9
महिला आणि तरुणी हरतालिकेचा उपवास ठेवतात. मुहूर्ताप्रमाणे दरवर्षी गौरीचे पूजन आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. शक्य तिथे महिला एकत्र येऊन पूजा आणि विसर्जन करतात.
advertisement
7/9
ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणच्या महिला नदीवर जाऊन गौरी पूजन आणि विसर्जन करतात. ज्या महिला शहरात राहतात त्यांना नदी किंवा तलाव शक्य नसते. तर तेव्हा घरी एखाद्या टब मध्ये पूजा विधी आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन विधी केली जाते.
advertisement
8/9
विसर्जनाच्या दिवशी ग्रामीण भागातील महिला नदीवर जाऊन विसर्जन करतात. तर शहरी भागातील महिला शक्यतो एकत्रित येत एखाद्या टबमध्ये विसर्जन करतात. तसेच त्यातील उगवलेले गव्हाचे रोपटे आपल्या केसात माळतात.
advertisement
9/9
कुमारीका चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित महिला पतीचे आयुष्य वाढावे तसेच आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करतात.