Pune Rain Update: पुण्यात पावसाचं धुमशान! थेऊर, लोणी आणि इंदापुरात घरांमध्ये शिरलं पाणी, Photo
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Rain Update: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.
advertisement
1/7

हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रविवारी रात्रीपासूनच शहरासह उपनगर भागात मुसळधार पाऊस सुरू असून, सिहंगड रोड, वाघोली, वडगाव शेरी, लोणी काळभोर या भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत.
advertisement
2/7
पुणे-सोलापूर रोडवरील लोणी, वाकवस्ती परिसर तसेच थेऊर, धायरी आणि इंदापूर भागात जोरदार पावसामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या तर घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.
advertisement
3/7
थेऊर गावातील सुमारे 50 घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. थेऊर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असून काही तासांत 180 मिमी पाऊस झाला आहे. घरांमध्ये पाणी शिरलं असून 70 लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
advertisement
4/7
खडकवासला धरणसाखळीत पाण्याचा साठा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
5/7
आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. पावसामुळे काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. पावसाचा जोर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
6/7
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नदीकाठच्या भागात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असं आवाहन पोलीस आणि महापालिकेनं केलं आहे. अनेक भागांत अजूनही पाऊस सुरू आहे.
advertisement
7/7
पुढील काही तासांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढील काही तास सतर्क राहावं लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Pune Rain Update: पुण्यात पावसाचं धुमशान! थेऊर, लोणी आणि इंदापुरात घरांमध्ये शिरलं पाणी, Photo