Dashavatar Collection : 'दशावतार'ने विकेंड गाजवला, केली दुप्पट कमाई; रविवारी मोडले रेकॉर्ड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dashavatar Movie Collection : पहिल्याच दिवशी दमदार कमाई केल्यानंतर दशावतार सिनेमाच्या शोमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे हा विकेंड 'दशावतार'ने चांगलाच गाजवला. रविवारी सिनेमा सर्वाधिक कमाई केली आहे.
advertisement
1/9

12 सप्टेंबरला रिलीज झालेला दशावतार हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
2/9
कोकणच्या लाल मातीत , मनात कोरला जाणारा ‘दशावतार' ने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळवलं. बाबुली मेस्त्रीची ही कथा प्रेक्षकांना आवडली आहे आणि सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे.
advertisement
3/9
दशावतार सिनेमाबरोबर 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' हे दोन सिनेमे देखील रिलीज झाले आहेत. या सिनेमांच्या तुलनेत दशावतारने पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग केली आहे.
advertisement
4/9
दशावतार सिनेमानं विकेंडला बॉक्स ऑफिसवर दुपट्ट कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी रविवारी सिनेमानं सर्वाधिक कमाई करण्यात यश मिळवलं आहे.
advertisement
5/9
sacnilkच्या रिपोर्टनुसार, दशावतार सिनेमानं पहिल्या दिवशी 58 लाखांची कमाई केली. आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट या सिनेमांच्या तुलनेत ही कमाई जास्त होती.
advertisement
6/9
त्यानंतर विकेंडच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दशावतार सिनेमानं 1.39 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दुप्पट कमाई झाली.
advertisement
7/9
दशावतार सिनेमानं विकेंडच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी पहिल्या दोन दिवसांचे रेकॉर्ड्स ब्रेक केलेत. रविवारी सिनेमानं तब्बल 2.4 कोटींची कमाई करण्यात यश मिळवलं आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दशावतार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केले होते.
advertisement
8/9
दशावतार सिनेमानं पहिल्या आठवड्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. सिनेमाची ऐकूण कमाई 4.37 कोटी रुपये इतकी झाली आहे.
advertisement
9/9
दशावतार हा सिनेमा सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री आहे. पहिल्याच विकेंडला 4 कोटींहून अधिक कमाई करणारा दशावतार जारण या हॉरर, सस्पेन्स सिनेमाला तगडी टक्कर देणार आहे. येणार्‍या दिवसात दशावतार हा कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड्स ब्रेक करेल यात शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dashavatar Collection : 'दशावतार'ने विकेंड गाजवला, केली दुप्पट कमाई; रविवारी मोडले रेकॉर्ड