TRENDING:

Asia Cup Point Table : पाकिस्तानवर 'सूर्या अँड कंपनी'कडून सर्जिकल स्ट्राईक, पाईंट्स टेबलच्या टॉपवर कोण? पाहा सुपर 4 चं समीकरण

Last Updated:
Asia Cup Point Table Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला आहे. अशातच आता सुपर 4 ची लढत (Asia Cup Semi Final Scenario) आणखी रंगतदार झाली आहे.
advertisement
1/8
Asia Cup Point Table : पाईंट्स टेबलच्या टॉपवर कोण? पाहा सुपर 4 चं समीकरण
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. आशिया कपच्या दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाने विजय मिळवलाय.
advertisement
2/8
25 बॉल शिल्लक असताना टीम इंडियाने विजयी पताका रोवला आहे. त्यामुळे भारतीय संघ पाईंट्स टेबलच्या टॉपवर पोहोचली आहे. टीम इंडियाने याचबरोबर सुपर 4 मध्ये देखील एन्ट्री मारली आहे.
advertisement
3/8
ग्रुप ए मध्ये पाहिलं तर टीम इंडियाने 2 पैकी 2 सामने जिंकले असून भारतीय संघ थेट सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारताच्या खात्यात 4 गुण असून टीम इंडिया सध्या टॉपवर आहे.
advertisement
4/8
तर टीम इंडियाचा नेट रन रेट (+4.793) जबरदस्त आहे. तसेच पाकिस्तानचा संघ एका विजयासह 2 पॉईंट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानला भारताविरुद्ध झालेल्या पराभवाचा फटका बसलाय.
advertisement
5/8
ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीम्स आता सुपर 4 साठी क्वालिफाय होण्याची शक्यता आहे. तर याच ग्रुपमध्ये ओमान आणि यूएई यांनी एकही मॅच जिंकलेली नाही.
advertisement
6/8
ग्रुप बी मध्ये मात्र जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या तिन्ही टीम्सकडे प्रत्येकी 2 पॉईंट्स आहेत. अफगाणिस्तानने 1 मॅच जिंकून (+4.700) च्या दमदार नेट रन रेटमुळे ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
advertisement
7/8
अफगाणिस्तान पाठोपाठ श्रीलंकेचा (+2.595) आणि बांगलादेशचा (+1.001) नंबर लागतो. दोन्ही मॅच हरलेला हॉंगकॉंगचा संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर झाला आहे.
advertisement
8/8
दरम्यान, 15 सप्टेंबरला ग्रुप ए मध्ये यूएई विरुद्ध ओमान आणि ग्रुप बी मध्ये श्रीलंका विरुद्ध हॉंगकॉंग यांच्यात मॅच होईल. ग्रुप बी मधील बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी मॅच निर्णायक ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup Point Table : पाकिस्तानवर 'सूर्या अँड कंपनी'कडून सर्जिकल स्ट्राईक, पाईंट्स टेबलच्या टॉपवर कोण? पाहा सुपर 4 चं समीकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल