TRENDING:

Weather Update: पाऊस गायब! आता राज्यात उष्णतेची लाट, तुमच्या जिल्ह्यात आज कसं असेल हवामान?

Last Updated:
advertisement
1/6
पाऊस गायब! आता राज्यात उष्णतेची लाट, तुमच्या जिल्ह्यात आज कसं असेल हवामान?
आता आजपासून राज्यातून अवकाळी पाऊस गायब झाला असून उकाडा वाढणार आहे. आज राज्यातील हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील उष्णतेचा पारा चाळीशी पार जाण्याचा अंदाज आहे.
advertisement
2/6
यामुळे राज्यातील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्यातच मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. 21 मार्च रोजी पारा 39 अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
3/6
मात्र, 22 मार्च रोजी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तापमानात 3 अंश सेल्सिअसची घट होणार आहे. त्यामुळे उकाडा काहीसा कमी होणार असून कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
पुणे शहरातही मागील काही दिवसांपासून कमाल तापमान सातत्याने 35 अंश सेल्सिअसवर होतं. 21 मार्च रोजी पुण्यामध्ये 37 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. 22 मार्च रोजीही पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस एवढं राहील, असा अंदाज आहे. तर, किमान तापमान 14 ते 15 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
विदर्भात गेल्या काही दिवसांत बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. आता मात्र पुढील आठवडाभर नागपूर आणि आसपासच्या परिसरावर ढगाळ हवामानाचं सावट कायम राहणार आहे. यामुळे तापमानामध्येही घट झाली आहे.
advertisement
6/6
नागपूरमध्ये 22 मार्च रोजी 35 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये 21 मार्च रोजी 37 अंश सेल्सिअस कमाल तापमान होतं. त्यामध्ये आज एका अंशाने वाढ होऊन ते 38 अंश सेल्सिअस राहील अशी शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: पाऊस गायब! आता राज्यात उष्णतेची लाट, तुमच्या जिल्ह्यात आज कसं असेल हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल