TRENDING:

अर्धा एकर शेतीत केळीची लागवड, शेतकरी कमावतोय लाखो रुपये, PHOTOS

Last Updated:
शेती हा व्यवसाय आता अनेकांसाठी फायदेशीर ठरत आहेत. अनेक जण विविध प्रकारची शेती करुन चांगले उत्पन्न कमवत आहेत. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन विचार केल्याने शेतीतूनही करिअर होऊ शकते, असा विचार अनेक जण करताना दिसत आहेत. (शुभम राज, प्रतिनिधी, खगडिया)
advertisement
1/7
अर्धा एकर शेतीत केळीची लागवड, शेतकरी कमावतोय लाखो रुपये, PHOTOS
बहुतांश शेतकरी हे गहू, धान किंवा मक्याची शेती करतात. मात्र, केळीची लागवड करणारे शेतकरीही अनेक पटींनी नफा कमावत आहेत. बिहार राज्यातील अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
2/7
खगडिया बल्लमजान येथील शेतकरी सोनेलाल सिंग यांनी अर्धा एकरमध्ये केळीची लागवड केली आहे. या माध्यमातून त्यांना प्रत्येक हंगामात लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
3/7
शेतकरी सोनेलाल सिंह सांगतात की, त्यांनी एका वर्षापूर्वी अर्धा एकरात केळीची लागवड केली. वर्षातून एकदा केळीचे पीक घेतले जाते, असे ते म्हणाले.
advertisement
4/7
तर केळीच्या पिकावर रोगराई न पसरल्यास एकदा पिकाची लागवड केल्यानंतर 3 ते 4 वर्षे उत्पादन मिळू शकते. तसेच नफाही चांगला आहे.
advertisement
5/7
तसेच खगडियासह अनेक जिल्ह्यांतील व्यापारी त्यांच्या शेतातूनच केळी घेऊन जातात, असे ते म्हणाले.
advertisement
6/7
ते पुढे म्हणाले की, त्यांनी अर्धा एक शेतीमध्ये केळीची 1200 रोपे लावली आहेत. यामध्ये प्रत्येक 1 रोप हे त्यांना 18 रुपयांना पडले. ते अर्धा एक केळीच्या शेतीतून प्रत्येक वर्षाला लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावत आहेत.
advertisement
7/7
त्यांनी सांगितले की, ते आपल्या शेतीत डीएपी, यूरिया, जाइम आणि थायमेटचा वापर करतात. तसेच उन्हाळ्यात ते एका महिन्यात 4 वेळा पटवान करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
अर्धा एकर शेतीत केळीची लागवड, शेतकरी कमावतोय लाखो रुपये, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल