एक निर्णय अन् जालनाच्या बळीराजाचं बदललं नशीब; 10 गुंठ्यात आता लाखोंची कमाई PHOTOS
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं फुलशेती करण्यासाठी लागणारी रोपं तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये त्याला मोठा आर्थिक फायदा होतोय.
advertisement
1/6

श्रावण महिना हा सण आणि उत्सवांचा म्हणून ओळखला जातो. या काळात फुलांना मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन शेतकरी फुल शेतीला मोठं प्राधान्य देत आहेत. <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं फुलशेती करण्यासाठी लागणारी रोपं तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये त्याला मोठा आर्थिक फायदा होतोय.
advertisement
2/6
कृष्णा चाव्हरे असं या युवकाचे नाव असून ते रोहन वाडी गावचे रहिवासी आहेत. 2012 पासून ते हा व्यवसाय करतात. फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे खरेदी करण्यासाठी खूप दूर जावे लागायचे. त्यामध्ये प्रवास भाडे आणि वेळ खर्च होत असे.
advertisement
3/6
हे गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी स्वतः च्या शेतावरच रोपे तयार करण्यास सुरुवात केली. झेंडू, ऑईस्टर, गलंडा आणि बिजली अशी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची रोपे त्यांच्याकडे मिळतात.
advertisement
4/6
चाव्हरे हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सोयाबीन, कापूस हे पारंपरिक पिकाचे उत्पन्न घेतं होते. त्यामधून त्यांना वार्षिक 2 ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळायचे. फुल रोप तयार करण्याच्या व्यवसायाने त्यांचे नशीब पालटले असून महिन्याला त्यांना यातून 1 लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे.
advertisement
5/6
प्रत्येक महिन्याला 1 ते 1.5 लाख रोपांची विक्री करतात. त्यामधून त्यांना वर्षाला 10 ते 12 लाख रुपये सहज मिळतात. विशेष म्हणजे फक्त 10 गुंठे जमिनीमध्ये त्यांनी ही किमया केलीय.
advertisement
6/6
जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांबरोबर बीड, गेवराई, चिखली, बुलडाणा या भागातून देखील रोपांची मागणी होते त्यांना बस द्वारे ही रोप पुरवली जातात. दर्जेदार रोपे शेतकऱ्यांना मिळत असल्याने त्यांच्या विश्वास वाढला आहे. हेच माझ्या चांगल्या व्यवसायाचं रहस्य आहे, असं कृष्णा यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
एक निर्णय अन् जालनाच्या बळीराजाचं बदललं नशीब; 10 गुंठ्यात आता लाखोंची कमाई PHOTOS