बाबो! चिकनपेक्षाही महाग झाली कोथिंबीर; दर वाचूनच चक्कर येईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
खाद्यपदार्थांवर वरून कोथिंबीर भुरभुरल्याशिवाय पदार्थ पूर्णच झाला नाही असं वाटतो. कोथिंबीर खाण्याचे अनेक फायदेही आहेत. अशी ही चविष्ट आणि गुणकारी कोथिंबीर ज्याचे दर गगनाला भिडले आहेत.
advertisement
1/7

कांदेपोहे, डाळ अशा पदार्थांना कोथिंबिरीशिवाय चव नाही. कोथिंबिरीची चटणी कोणत्याही खाद्यपदार्थाची चव दुप्पट करते. कोथिंबीर चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कोथिंबीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/7
कोथिंबिरीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरात रोग प्रतिरोधक क्षमता बळकट करते.
advertisement
3/7
कोथिंबीरचा वापर केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि अपचन, पोटदुखी, गॅसच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. यामुळे पाचक शक्ती वाढते. हिवाळ्यात अतिसाराची समस्या उद्धभवते. ही समस्या कोथिंबिरीमुळे दूर होते.
advertisement
4/7
कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. कोथिंबिरीत असलेले घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून नियंत्रणात ठेवतात. रक्तातील इन्सुलिनचं प्रमाणही नियंत्रित करतं.
advertisement
5/7
अशा गुणकारी कोथिंबिरीचे दर वाढले आहेत. होलसेल बाजारात 300 ते 350 रुपये किलो दर असून किरकोळ बाजारात 400 रुपये दर आहे. यवतमाळमध्ये 300 रुपये, अकोलामध्ये 300 ते 350 रुपये आणि वाशिममध्ये 400 रुपये किलो कोथिंबीर विकल्या जात आहे. मुंबईमध्ये कोथिंबीर 200 रुपये जुडी विकली जात आहे.
advertisement
6/7
अमरावती जिल्ह्यात सध्या कोथिंबीर सर्वात महाग विकल्या जात आहे. अमरावतीत कोथिंबिरीची जुडी 100 रुपयांना मिळते आहे. तर एक किलो कोथिंबिरीची किंमत 400 रुपये आहे.
advertisement
7/7
अमरावती चिकन 200 रुपये किलो आहे. कोथिंबीर मात्र 400 रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे चिकनपेक्षाही कोथिंबीर महाग असल्याची जोरदार चर्चा आहे. म्हणजे एकवेळ चिकन परवडेल पण कोथिंबीर नको, अशी परिस्थिती सध्या आहे.