TRENDING:

चल ना क्रेडिट कार्ड आहेच! असा विचार करताय? या 5 चुका आयुष्यभर पश्चाताप करायला लावतील

Last Updated:
एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी अनोळखी लिंकवरून पेमेंट करू नये, मेसेज किंवा ई-मेलमधील संशयास्पद लिंकपासून सावध राहा.
advertisement
1/7
चल ना क्रेडिट कार्ड आहेच! असा विचार करताय? या 5 चुकांमुळे आयुष्यभर पश्चाताप कराल
क्रेडिट कार्ड ही आजच्या काळात एक मोठी आर्थिक सुविधा ठरली आहे, पण त्याच वेळी, जर तुमचे आर्थिक नियोजन चांगले नसेल तर हेच कार्ड तुमच्यासाठी सर्वात मोठे कर्ज-जाळे (Debt Trap) बनू शकते. अनेक लोक क्रेडिट कार्ड वापरताना एक मोठी चूक करतात, जी भविष्यात खूप महागात पडते, ती म्हणजे पूर्ण बिल न भरणे.
advertisement
2/7
फक्त 'मिनिमम पेमेंट ड्यू' भरून आपण स्वतःची समजूत घालतो, पण हीच सर्वात मोठी आर्थिक चूक आहे. याचे कारण असे आहे की, शिल्लक राहिलेल्या रकमेवर १६ टक्क्यांपासून पुढे प्रचंड व्याज लागू होते आणि तुम्ही कर्जाच्या खोल गर्तेत अडकता.
advertisement
3/7
या 'मिनिमम पेमेंट ट्रॅप' मध्ये अडकल्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ, समजा तुमचा EMI १० हजार रुपये आहे, पण मिनिमम ड्यूमध्ये तुम्हाला फक्त ३-४ हजार रुपये भरायला सांगितले जातात. तुम्ही तेवढे भरता, पण उरलेल्या रकमेवर त्वरित व्याज आकारले जाते.
advertisement
4/7
यामुळे तुम्ही दर महिन्याला जास्तीचे व्याज भरत राहता आणि वर्षानुवर्षे केवळ कर्जाचे हप्ते फेडत राहता. यामुळे तुमची बचत (Saving) होत नाही. बिल वेळेत भरले नाही, म्हणजे ड्यु डेटनंतर भरले, तर दंड (Fine) लागतो आणि या सर्व गोष्टींचा सिबिल स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.
advertisement
5/7
क्रेडिट कार्ड वापरताना टाळायची दुसरी मोठी चूक म्हणजे ATM मधून पैसे काढणे. क्रेडिट कार्ड वापरून ATM मधून पैसे काढल्यास रकमेवर त्वरित ३ टक्के चार्ज लागतो (म्हणजे१०००० वर सुमारे ३००). याऐवजी ATM डेबिट कार्ड वापरणे किंवा UPI वापरणे जास्त फायद्याचे ठरते, कारण त्यावर कोणताही चार्ज लागत नाही. तसेच, एकाच वेळी अनेक क्रेडिट कार्ड घेण्याचा मोह टाळा.
advertisement
6/7
पैशांचे योग्य नियोजन नसेल तर अनेक कार्डांमुळे तुमचा खर्च आणि कर्ज दोन्ही वाढतात. EMI आणि त्यावरील चार्जेसचा बोजा वाढत जातो आणि त्यातून मोठे कर्ज तयार होते.'स्वाइप इट' (Swipe It) म्हणणे जितके सोपे असते, तितकेच ते करणेही सोपे असते, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय लागते. सततच्या EMI मुळे आपले महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडते. अनेक वेळा परिस्थिती अशी येते की, सर्व EMI भरल्यानंतर खिशात आणि खात्यात पैसे उरत नाहीत.
advertisement
7/7
क्रेडिट कार्ड ही सुविधा आहे, पण तुमचे आर्थिक नियोजन चांगले असेल तरच! नाहीतर तुम्हाला कर्जात ओढण्याचा हा सर्वात मोठा सापळा आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड आहे म्हणून खर्च करू नका, तुम्हाला खरोखर गरज असेल तरच त्याचा वापर करा. अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
चल ना क्रेडिट कार्ड आहेच! असा विचार करताय? या 5 चुका आयुष्यभर पश्चाताप करायला लावतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल