Debit Card : किती प्रकारचे असतात डेबिट कार्ड, जाणून घ्या तुमच्या कार्डमध्ये कोणकोणते बेनिफ्ट्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेत तुमचे अकाउंट उघडता तेव्हा तुम्हाला डेबिट कार्ड देखील दिले जाते. बहुतेक लोक तेच डेबिट कार्ड वापरतात जे त्यांना बँकेने जारी केले आहे. पण डेबिट कार्डचेही अनेक प्रकार आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. या सर्व कार्डचे वेगवेगळे फायदे आहेत. येथे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डेबिट कार्ड्सविषयी सांगत आहोत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते तुमच्या बँकेतून घेऊ शकता.
advertisement
1/5

RuPay Debit CardRuPay डेबिट कार्ड मुख्यतः देशांतर्गत व्यवहार आणि कॅश काढण्यासाठी वापरले जाते. हे डेबिट कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केले आहे. तुम्ही ते ऑनलाइन आणि किरकोळ खरेदीसाठी आणि बिले भरण्यासाठी वापरू शकता.
advertisement
2/5
Gold Visa Card या कार्डमध्ये तुम्हाला ग्लोबल कस्टमर असिस्टन्स सर्व्हिसेसचा लाभ मिळतो. हे कार्ड तुम्ही देशाबाहेरही वापरू शकता. तुम्हाला जगभरातील रिटेल, डायनिंग आणि एंटरटेनमेंट आउटलेटवर हे कार्ड वापरताना अनेक प्रकारच्या ऑफर देखील मिळतात.
advertisement
3/5
MasterCard मास्टर कार्ड्स तीन प्रकारचे असतात - Standard Debit Card, Enhanced Debit Card कार्ड आणि World Debit MasterCard. ज्यावेळी तुम्ही उकाउंट उघडण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला बँकेकडून स्टँडर्ड डेबिट कार्ड दिले जाते. तुम्ही ते जगभरात वापरू शकता.
advertisement
4/5
Classic Debit Card क्लासिक कार्ड हे बेसिक डेबिट कार्ड आहे. या कार्डमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या कस्टमर सर्व्हिसेस मिळतात. तुम्ही तुमचे कार्ड कधीही बदलू शकता. या कार्डच्या मदतीने तुम्ही इमरजेंसी परिस्थितीत अडव्हान्स रक्कमही काढू शकता.
advertisement
5/5
Platinum Card : तुम्ही हे कार्ड जागतिक स्तरावर देखील वापरू शकता. यामध्ये तुम्हाला कॅश डिस्बर्समेंटपासून ते ग्लोबल एटीएम नेटवर्कपर्यंत सुविधा मिळतात. याशिवाय मेडिकल आणि लीगल रेफरलआणि असिस्टेंस उपलब्ध आहे. या कार्डद्वारे अनेक प्रकारच्या डील, डिस्काउंट ऑफर आणि इतर सुविधांचा लाभ घेता येतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Debit Card : किती प्रकारचे असतात डेबिट कार्ड, जाणून घ्या तुमच्या कार्डमध्ये कोणकोणते बेनिफ्ट्स