फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची मुदत, नंतर मोजावे लागणार इतके पैसे, वाचा नवा नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आधार कार्ड हे अनेक सरकारी योजनांसाठी महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी आधार बनवलेल्यांनी ही मोफत संधी 14 जूनपूर्वीच मिळवावी आणि कागदपत्रं अपडेट करून आपली माहिती अद्ययावत ठेवावी. अन्यथा, नंतर तुमच्याकडून शुल्क आकारलं जाईल आणि वेळ वाया जाईल.
advertisement
1/7

आपलं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सगळीकडे दाखवतो. आधार कार्ड अगदी सिमकार्ड घेण्यापासून ते बँकेच्या कामापर्यंत प्रत्येक ठिकाणी लागतं. त्या आधारकार्डमध्ये जर तुम्हाला नाव, पत्ता किंवा फोननंबर यासारख्या गोष्टी अपडेट करायच्या असतील तर आताच करुन घ्या. याचं कारण म्हणजे आधार कार्डवर आता फुकटात नाव गाव पत्ता अपडेट करता येणार नाही. फ्रीमध्ये माहिती अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून आहे. त्यानंतर मात्र आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागणार आहेत.
advertisement
2/7
तुमचं आधारकार्ड 10 वर्षांपूर्वीचं आहे का? आणि अजूनही अपडेट केलं नसेल? तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने दिलेल्या माहितीनुसार, आधारधारकांसाठी फ्री अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 आहे. त्यानंतर आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि नजीकच्या आधार केंद्रावर प्रत्यक्ष जावं लागेल.
advertisement
3/7
आधार एनरोलमेंट अँड अपडेट रेग्युलेशन्स, 2016 नुसार, प्रत्येक 10 वर्षांनी आधार कार्डधारकांनी आपली ओळख आणि पत्ता अपडेट करणं बंधनकारक आहे. अनेक नागरिकांनी 2011–2014 दरम्यान आधार बनवल्याने आता त्यांना हे अपडेट करणं गरजेचं ठरतंय.
advertisement
4/7
UIDAI च्या myAadhaar पोर्टल वरून घरबसल्या मोफत अपडेट करता येऊ शकतं. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि फक्त 5–10 मिनिटांत पूर्ण होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला काही सिंपल स्टेप फॉलो करायच्या आहेत. त्या केल्या तर तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता.
advertisement
5/7
वेबसाईट उघडा, https://myaadhaar.uidai.gov.in ही लिंक सुरू करा. तिथे तुमचं लॉगइन करा आणि ब्लू रंगाच्या Login बटनावर क्लिक करा, आधार क्रमांक टाका आणि ओटीपीद्वारे लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला वर Document Update पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
advertisement
6/7
ड्रॉप-डाऊन यादीतून पत्ता किंवा ओळखीचा पुरावा निवडा आणि संबंधित डॉक्युमेंट JPEG, PNG किंवा PDF फॉरमॅटमध्ये अपलोड करा (फाईल 2MB पेक्षा लहान असावी). माहिती पडताळा करा आणि सबमिट करा. नंतर Service Request Number (SRN) मिळेल ज्याद्वारे स्टेटस ट्रॅक करता येईल.
advertisement
7/7
14 जूननंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. नाव, पत्ता, फोन नंबर, जन्म तारीख किंवा फोटो अपडेट करण्यासाठी आता शुल्क भरावं लागणार आहे. प्रत्येकी 50 रुपये यासाठी चार्ज 14 जूननंतर आकरला जाणार आहे. तुम्ही अजून आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर तुमच्याकडे १७ दिवस बाकी आहेत. लगेच करून घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची मुदत, नंतर मोजावे लागणार इतके पैसे, वाचा नवा नियम