TRENDING:

Gold Rate: आज सोनं स्वस्त की महाग? नाशिक सराफा बाजारातून मोठी अपडेट

Last Updated:
Gold Rate Today: गेल्या 4 दिवसांत सोन्याच्या दरांत सातत्याने वाढ होतेय. आज सराफा बाजारातून महत्त्वाचं अपडेट असून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ लागणार आहे.
advertisement
1/5
Gold Rate: आज सोनं स्वस्त की महाग? नाशिक सराफा बाजारातून मोठी अपडेट
सध्या संपूर्ण जगभरात सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. भारतात सोन्याच्या भावानं प्रति तोळा जवळपास लाखाचा टप्पा गाठला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात काहीशी घसरण झाली होती. मात्र चालू आठवड्यात पुन्हा सोन्याला झळाळी आल्याचे चित्र आहे.
advertisement
2/5
सध्याच्या आठवड्यात सोमवारपासूनच सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होतेय. नाशिक सराफा बाजारात आज सोनं पुन्हा महागलंय. आज सोन्याच्या दरात पुन्हा 600 रुपयांची वाढ झाल्याने 4 दिवसांत तब्बल 3600 रुपयांनी सोनं महागलंय.
advertisement
3/5
आज नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या भावत 600 रुपयांची वाढ वाढला असून आज 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोनं घेण्यासाठी 97 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 24 कॅरेट सोन्याला बाजारात 94 हजार 75 रुपये अशी मोड मिळणार.
advertisement
4/5
आज 22 कॅरेट दागिन्यांसाठी प्रतितोळा 89 हजार 310 रुपये आज मोजावे लागतील. तर 18 कॅरेट सोन्यासाठी आज 73 हजार 125 रुपये हे मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील वाढ झाली असून आज 1 किलो चांदीसाठी 1 लाख 2300 रुपये मोजावे लागतील.
advertisement
5/5
गेल्या काही काळात सराफा बाजारात मोठे फेरफार दिसत आहेत. सोनं 90 हजार ते 1 लाखांच्या दरम्यान कायम असून सतत चढउतार होत आहेत. त्यामुळे ग्राहकांत संभ्रम असून ग्राहकांची मागणी कमी असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate: आज सोनं स्वस्त की महाग? नाशिक सराफा बाजारातून मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल