TRENDING:

Gold Rate: सराफा बाजारात मोठी घडामोड, सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, पाहा तोळ्याचा दर

Last Updated:
Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढउतार होत आहेत. आज सोनं स्वस्त झालं असून चांदी 1100 रुपयांनी महागलीये.
advertisement
1/5
सराफा बाजारात मोठी घडामोड, सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, पाहा तोळ्याचा दर
गेल्या काही काळात लाखाच्या घरात गेलेलं सोनं पुन्हा घसरलं होतं. सराफा बाजारात सातत्याने चढउतार होत आहेत. आता पुन्हा एकदा सराफा बाजारातून मोठं अपडेट आहे. चालू आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालंय.
advertisement
2/5
नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या दरांत तब्बल 1300 रुपयांची घट झालीये. त्यामुळे ऐन लग्नसराईत नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच सोन्यात गुंतवणूक करणारांसाठी देखील सुवर्णसंधी मानली जातेय.
advertisement
3/5
बुधवारी नाशिक सराफा बाजारात सोन्याचे दर 200 रुपयांनी घटले होते. आज गुरुवारी देखील त्यात 1300 रुपयांची घट झालीये. त्यामुळे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 2 दिवसांत 1500 रुपयांनी घसरले आहेत.
advertisement
4/5
सराफा बाजारात आज 24 कॅरेज 10 ग्रॅम सोनं 94 हजार 900 रुपयांवर आहे. तर तेवढ्याच मोडीसाठी 92 हजार 53 रुपये मिळतील. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी 86 हजार 928 रुपये मोजावे लागतील.
advertisement
5/5
सोन्यासोबतच चांदीच्या दरांत देखील बदल जाणवत आहेत. आज चांदी देखील 200 रुपयांनी घसरली असून एक किलोसाठी 98 हजार 700 रुपये द्यावे लागतील. सोन्या-चांदीच्या दरांत पुढील काही काळ चढउतार कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate: सराफा बाजारात मोठी घडामोड, सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, पाहा तोळ्याचा दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल