TRENDING:

Jalgaon Gold Silver Price: 8 दिवसांत 27000 रुपयांचा रिटर्न, सोन्या चांदीच्या दरांचा नवा विक्रम, कुठे पोहोचले दर?

Last Updated:
जळगाव बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीनेही विक्रमी दर गाठले असून, चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
advertisement
1/7
जळगाव: 8 दिवसांत 27000 रुपयांचा रिटर्न, सोन्या चांदीच्या दरांचा नवा विक्रम
जळगाव, प्रतिनिधी नितीन नांदुरकर: 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या बाजारात सोन्याने विक्रमी मजल मारल्यानंतर आता चांदीनेही मोठी झेप घेतली आहे. चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, जीएसटीसह (GST) चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८१ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. सोन्या चांदीचे दर झपाट्याने वाढत आहेत.
advertisement
2/7
दिवाळीतही सोन्या चांदीचे दर वाढणार आहेत. सततच्या दरवाढीमुळे सोनं खरेदी करणं महाग झालं आहे. चांदीच्या दरात ही वाढ अत्यंत वेगाने झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अवघ्या आठ दिवसांमध्ये चांदीच्या भावात तब्बल २७ हजार रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
advertisement
3/7
या वाढत्या दरांमुळे ग्राहक आता चांदी खरेदी करताना आठ दिवसांची मुदत मागत आहेत. विशेष म्हणजे, चांदीची मागणी वाढली असली तरी, मार्केटमध्ये सध्या चांदीचा साठा शिल्लक नाही, असे मत सोने तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
advertisement
4/7
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ रेट धोरण आणि अमेरिकन बँकांनी व्याजदर कमी केल्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे मोर्चा वळवला आहे. इंडस्ट्रियल झोन मध्ये चांदीची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
advertisement
5/7
चांदीचा उपयोग इलेक्ट्रॉनिक आणि सौर ऊर्जा क्षेत्रासह अनेक उद्योगांमध्ये होत असल्यामुळे दरात मोठी वाढ होत आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचा भाव जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख २७ हजार ४०० रुपये इतका आहे. आता सोन्याच्या पाठोपाठ चांदीनेही विक्रमांचे शिखर गाठल्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
6/7
चांदीचे दर डिसेंबरपर्यंत 2 लाख रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त सोनं आताच खरेदी करा. सोनं-चांदीची ETF मध्ये गुंतवणूक वाढली आहे.
advertisement
7/7
लग्नसराईत सोनं-चांदी वाढल्याने टेन्शन वाढलं आहे. मात्र सोन्यातील रिटर्न्स पाहता लोक खरेदी करत आहेत. त्यामुळे सराफ मार्केटमध्ये मागणी घटली तरीसुद्धा लोक सोनं खरेदी करणं सुरू आहे. आता लक्ष्मीपूजनाला पुन्हा मोठी दरवाढ होईल असा तज्ज्ञांचा दावा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Jalgaon Gold Silver Price: 8 दिवसांत 27000 रुपयांचा रिटर्न, सोन्या चांदीच्या दरांचा नवा विक्रम, कुठे पोहोचले दर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल